राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
Pune Shocking News : ललित पाटील प्रकरणातून बहुकोटी ड्रग्ज सिंडिकेटचा भंडाफोड झाल्यानंतरही,पुण्यात अमलीपदार्थांचा व्यवसाय सुरु असल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.पिंपरी चिंचवडमध्ये हायड्रोपोनिक गांजाच्या शेतीचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तुषार चेतन वर्मा (21), सुमित संतोष देदवाल (25), अक्षय सुखलाल महेर (25), मलय डेलिवाला (28), आणि स्वराज अनंत भोसलें, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पुण्यात AI च्या मदतीने सुरु केलेल्या गांजाच्या शेतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यासाठी हायड्रोफोनीकचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे. आरोपींनी मबीए आणि एमटेकचं शिक्षण घेतल्याचं समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, या नार्कोटिक रॅकेटची सुरुवात खडकीत झाली.काही दिवसांपूर्वी पोलिसांनी गस्त घातली होती. पोलिसांनी आरोपी चेतन वर्माला हायड्रोपोनिक गांजासह पकडलं. नार्कोटिक ड्रग्ज प्रकरणात त्याच्या नावाची नोंद करण्यात आलीय.याप्रकरणी API अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आणि त्यांच्या चौकशीतून मोठे धागेदोरे समोर आले. वर्मा यांनी सांगितलं की,आरोपी सुमित देदवाल आणि अक्षय महेर यांना अमलीपदार्थ विकत होता. यामुळे तपास अधिक विस्तारित करण्यात आला आणि संपूर्ण शहरभर पसरलेले मोठे जाळे समोर आले.
नक्की वाचा >> 100 रुपयांत विकले जातात कपलचे प्रायव्हेट व्हिडीओ, दलालांचा अवैध धंदा, Telegram वर व्हिडीओ लीक
गांजा पिकवण्यासाठी हायड्रोपोनिक शेती
पोलिसांना सापडलेले पुरावे धक्कादायक होते. या टोळीने पिंपरी चिंचवडमधील गर्दीच्या परिसरात एक फ्लॅट भाड्याने घेतला होता आणि OG-Kush प्रकारच्या गांजाच्या लागवडीसाठी मिट्टी-आधारित हायड्रोपोनिक शेती उभारली होती. ऑटोमेटेड सिस्टम्स, लाईट्स आणि वैज्ञानिक पद्धतींनी पिके जिवंत ठेवली होती. पोलिसांनी छापा मारला तेव्हा गांजाची झाडे, कापणी केलेली सामग्री, तसेच लागवडीसाठी तयार रोपे जप्त करण्यात आली. संपूर्ण शेती नष्ट करण्यात आली. ही तरुण मंडळी इंजिनिअरिंगची पदवीधर असून त्यांनी संपूर्ण प्रक्रिया अत्यंत कौशल्याने विकसित केली होती.
तपासानंतर मुंबई आणि गोव्यापर्यंत वाढवण्यात आला. तपासात पोलिसांना मोठ्या प्रमाणावर अमलीपदार्थ सापडले. पोलिस म्हणाले, “कॅनाबिस, हायड्रोपोनिक OG Kush, चरस, MD (मेफेड्रोन), सायकेडेलिक मशरूम, LSD पेपर्स, कॅनाबिस गम्मीज, MAMD गोळ्या आणि CBD तेल – मिळून विविध प्रकारचे अमलीपदार्थ ₹3.45 कोटी किमतीचे जप्त करण्यात आले, तसेच ₹7.80 लाखांची मालमत्ता गोठवण्यात आली आहे.” आरोपी डार्क वेब वापरून ड्रग्ज खरेदी-विक्री करत होते. पोलिसांच्या नजरेपासून दूर राहण्यासाठी प्रत्येक आर्थिक व्यवहार क्रिप्टोकरन्सी आणि हवाला मार्गे केला जात होता.