जाहिरात

Pune News: निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात खळबळ! AI च्या मदतीने गांजाची शेती, MBA इंजिनिअर आरोपींना अटक, Video

ललित पाटील प्रकरणातून बहुकोटी ड्रग्ज सिंडिकेटचा भंडाफोड झाल्यानंतरही,पुण्यात अमलीपदार्थांचा व्यवसाय सुरु असल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.पिंपरी चिंचवडमध्ये हायड्रोपोनिक गांजाच्या शेतीचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे.

Pune News:  निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात खळबळ! AI च्या मदतीने गांजाची शेती, MBA इंजिनिअर आरोपींना अटक, Video
Ganja Farm In Pune Crime News
पुणे:

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

Pune Shocking News : ललित पाटील प्रकरणातून बहुकोटी ड्रग्ज सिंडिकेटचा भंडाफोड झाल्यानंतरही,पुण्यात अमलीपदार्थांचा व्यवसाय सुरु असल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.पिंपरी चिंचवडमध्ये हायड्रोपोनिक गांजाच्या शेतीचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तुषार चेतन वर्मा (21), सुमित संतोष देदवाल (25), अक्षय सुखलाल महेर (25), मलय डेलिवाला (28), आणि स्वराज अनंत भोसलें, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पुण्यात AI च्या मदतीने सुरु केलेल्या गांजाच्या शेतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यासाठी हायड्रोफोनीकचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे. आरोपींनी मबीए आणि एमटेकचं शिक्षण घेतल्याचं समजते. 

मिळालेल्या माहितीनुसार, या नार्कोटिक रॅकेटची सुरुवात खडकीत झाली.काही दिवसांपूर्वी पोलिसांनी गस्त घातली होती. पोलिसांनी आरोपी चेतन वर्माला हायड्रोपोनिक गांजासह पकडलं. नार्कोटिक ड्रग्ज प्रकरणात त्याच्या नावाची नोंद करण्यात आलीय.याप्रकरणी API अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आणि त्यांच्या चौकशीतून मोठे धागेदोरे समोर आले. वर्मा यांनी सांगितलं की,आरोपी सुमित देदवाल आणि अक्षय महेर यांना अमलीपदार्थ विकत होता. यामुळे तपास अधिक विस्तारित करण्यात आला आणि संपूर्ण शहरभर पसरलेले मोठे जाळे समोर आले.

नक्की वाचा >> 100 रुपयांत विकले जातात कपलचे प्रायव्हेट व्हिडीओ, दलालांचा अवैध धंदा, Telegram वर व्हिडीओ लीक

गांजा पिकवण्यासाठी हायड्रोपोनिक शेती

पोलिसांना सापडलेले पुरावे धक्कादायक होते. या टोळीने पिंपरी चिंचवडमधील गर्दीच्या परिसरात एक फ्लॅट भाड्याने घेतला होता आणि OG-Kush प्रकारच्या गांजाच्या लागवडीसाठी मिट्टी-आधारित हायड्रोपोनिक शेती उभारली होती. ऑटोमेटेड सिस्टम्स, लाईट्स आणि वैज्ञानिक पद्धतींनी पिके जिवंत ठेवली होती. पोलिसांनी छापा मारला तेव्हा गांजाची झाडे, कापणी केलेली सामग्री, तसेच लागवडीसाठी तयार रोपे जप्त करण्यात आली. संपूर्ण शेती नष्ट करण्यात आली. ही तरुण मंडळी इंजिनिअरिंगची पदवीधर असून त्यांनी संपूर्ण प्रक्रिया अत्यंत कौशल्याने विकसित केली होती. 

तपासानंतर मुंबई आणि गोव्यापर्यंत वाढवण्यात आला. तपासात पोलिसांना मोठ्या प्रमाणावर अमलीपदार्थ सापडले. पोलिस म्हणाले, “कॅनाबिस, हायड्रोपोनिक OG Kush, चरस, MD (मेफेड्रोन), सायकेडेलिक मशरूम, LSD पेपर्स, कॅनाबिस गम्मीज, MAMD गोळ्या आणि CBD तेल – मिळून विविध प्रकारचे अमलीपदार्थ ₹3.45 कोटी किमतीचे जप्त करण्यात आले, तसेच ₹7.80 लाखांची मालमत्ता गोठवण्यात आली आहे.” आरोपी डार्क वेब वापरून ड्रग्ज खरेदी-विक्री करत होते. पोलिसांच्या नजरेपासून दूर राहण्यासाठी प्रत्येक आर्थिक व्यवहार क्रिप्टोकरन्सी आणि हवाला मार्गे केला जात होता.

नक्की वाचा >> Viral Video: "आता तू बघच..", रात्रीच्या प्रवासादरम्यान Rapido ड्रायव्हरने महिलेसोबत केलं घाणेरडं कृत्य

‘अलख निरंजन' उघड झाला

मुख्य आरोपी तुषार वर्मा डार्क वेबवर स्वतःची ओळख लपवण्यासाठी स्वतःला “अलख निरंजन” असे नाव देत होता. या बनावट ओळखीखाली तो मोठ्या प्रमाणात ड्रग विक्रीचे नियोजन आणि समन्वय करत होता. या टोपण नावावरूनच पोलिसांनी इतर आरोपींना पकडण्यासाठी विशेष मोहिम राबवली. संयुक्त पोलीस आयुक्त रंजन शर्मा, अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, डीसीपी सोमय मुंडे, निरीक्षक कदम, निरीक्षक गवाड आणि खडकी पोलिस कर्मचारी, अँटी-नार्कोटिक्स सेल आणि क्राईम ब्रँच यांनी मिळून अनेक दिवस कसून काम केले. शेवटी पोलिसांनी देदवाल आणि महेर यांना हिंजवडीहून अटक केली, तर मलय डेलिवालाला आसामहून परत आल्यानंतर मुंबई विमानतळावर पकडले. स्वराज भोसलें याला कुर्ल्यातून अटक करण्यात आली. 

अमलीपदार्थ भविष्य नष्ट करत आहेत

डीसीपी सोमय मुंडे म्हणाले, “नार्कोटिक्स आपल्या तरुणांचे भविष्य नष्ट करत आहेत. हायड्रोपोनिक गांजा शेती, डार्क वेब नेटवर्क आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शन्सवर केलेली कारवाई ही गुन्हेगारांसाठी इशारा आहे. पुणे शहरात बेकायदेशीर ड्रग व्यापार सहन केला जाणार नाही.ललित पाटील प्रकरणानंतर, पुणे पोलिसांनी शहर ड्रग्समुक्त करण्याचा शब्द दिला आहे. ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन' सुरू आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com