Pune News : भिगवणमधील तरुणीच्या अपहरण प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट, सत्र न्यायालयात काय घडलं?

पुण्याच्या इंदापूरच्या भिगवणमधील कथित अपहरण प्रकरणात भिगवण पोलिसांनी आरोपी अझर शेखला आज अटक केली आहे. शेखला इंदापूर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Bhigwan Kidnapping Case Latest Update

देवा राखुंडे, प्रतिनिधी 

Pune Bhigwan Case Latest News :  पुण्याच्या इंदापूरच्या भिगवणमधील कथित अपहरण प्रकरणात भिगवण पोलिसांनी आरोपी अझर शेखला आज अटक केली आहे. शेखला इंदापूर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.आरोपी शेखला न्यायालयाने 27 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे,अशी माहिती अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी दिली आहे.

यापूर्वीच अझर शेखला दौंड पोलिसांनी 27 फेब्रुवारी रोजी दौंड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात अटक केली होती.आता पुन्हा भिगवण पोलिसांनी अझर शेख भिगवण प्रकरणात अटक केली आहे, अशी माहिती सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी दिली आहे. 17 फेब्रुवारी रोजी भिगवण मध्ये एका मुलीचं अपहरण झालं होतं.मात्र हे अपहरण प्रेम संबंधातून झाल्याचं तपासात पुढे आलं. 18 फेब्रुवारी रोजी भिगवणमध्ये आमदार गोपीचंद पडळकर आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला होता. संपूर्ण महाराष्ट्रात हा विषय गाजला होता. 

Advertisement

नक्की वाचा >> Kalyan News: कल्याणच्या खडवलीत नदीकाठी भयंकर घटना, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातवरण

पोलिसांनी सापळा रचून अझर शेखला बेड्या ठोकल्या

यावेळी या प्रकरणात अझर शेखला आरोपी करून त्याला अटक करावी आणि त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती.आज अखेर भिगवण पोलिसांनी सापळा रचून अझर शेखला बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित तरुणीने या प्रकरणात तिचे जबाब सतत बदलले असून 4 एप्रिल रोजी तिने भिगवण पोलिसांसमोर तिचा पुरवणी जबाब दिला आहे.

या जबाबात अझर शेख याच्यावर पीडित तरुणीने आरोप केले आहेत. यातील मुख्य आरोपीकडून आपल्यावर अत्याचार करण्यात आला, त्यावेळी मुख्य आरोपीला अझर शेखने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.दरम्यान, मुख्य आरोपी सध्या फरार आहे. या प्रकारात एकूण चार आरोपी असून यातील एकाला अटक केली आहे तर तीन जण फरार आहेत.

नक्की वाचा >> आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या एका पत्राने खळबळ, बदलापूर नगरपालिकेच्या सभेत राडा, वामन म्हात्रे संतापले, Video

काय आहे प्रकरण?

भिगवण मध्ये 17 फेब्रुवारी 2026 रोजी एका तरुणीचे अपहरण झाले होते.भिगवण बाजारपेठेतून या तरुणीचं अपहरण झालं अशी तक्रार भिगवण पोलीस ठाण्यात 17 फेब्रुवारी रोजी दाखल झाली.आपल्या डोळ्यात मिरचीची पूड फेकत आणि आपल्याला मारहाण करत आपल्यासमोर मुलीचं अपहरण झालं, अशी फिर्याद संबंधित तरुणीच्या आईने भिगवण पोलिसात नोंदवली. त्यानंतर 18 फेब्रुवारी रोजी भिगवण मध्ये बंद पाळण्यात आला होता.तर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली भिगवण पोलीस ठाण्यावर हिंदू जनआक्रोश मोर्चाही काढण्यात आला होता.