पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, दारु पिऊन वाहन चालवल्यास परवाना थेट रद्दच होणार! 

राज्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या प्रकरणांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

पुण्यात वारंवार दारू पिऊन वाहन चालविण्याच्या घटना समोर येत असताना मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या प्रकरणांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. शहरात दारु पिऊन वाहन चालविता येणार नाही. जर दारु पिऊन गाडी चालवल्यास परवाना रद्द केलं जाणार आहे. ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना वाढत असल्यानं पुणे पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

पुण्यात ड्रंक अँड ड्राइव्हचे अने गुन्हे दाखल
पुण्यात वाढणाऱ्या ड्रंक अँड ड्राईव्ह घटनांना आळा (Driving license canceled) घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावलं उचलायला सुरुवात झाली आहे. पुण्यात गेल्या सहा महिन्यात 1684 जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर फक्त खटले दाखल करून कारवाई केली जात होती.

Advertisement

नक्की वाचा -पुण्यातील 42 बांगलादेशी नागरिकांचे पासपोर्ट रद्द, 'त्या' एजंटने कसा काढून दिला भारतीय पासपोर्ट?

आता थेट परवानाच रद्द
मात्र यापुढे जर आता कोणी चालक दारू पिऊन गाडी चालवताना आढळून आला तर पहिल्यांदा त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द केले जाईल. त्याच व्यक्तीने जर पुन्हा गुन्हा केला तर सहा महिन्यापर्यंत त्याचा परवाना रद्द करण्यात येईल. मात्र तिसऱ्या वेळीही पुन्हा तीच व्यक्ती आढळून आली तेव्हा मात्र त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरूपी रद्द होणार अशी माहिती पुणे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे.

Advertisement

कल्याणीनगर प्रकरणात देशभरातून संताप
पुण्यातील बहुचर्चित कल्याणीनगर कार अपघात प्रकरणाने देशात एकच संताप उसळला होता. आरोपीला वाचविण्यासाठी सर्वच यंत्रणा कामाला लागल्याचे सुरुवातीला दिसून आले होते. जनक्षोभ वाढताच त्याच यंत्रणांचा सूर आणि नूर पालटला. त्यानंतर या रविवारी पुण्यातील बोपोडीत हिट अँड रन प्रकरण घडले. फरसखाना ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांना काही मद्यपींनी पेटवून दिल्याचे प्रकरण ताजे असताना आता पोलिसांनी याप्रकाराला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या प्रकारात घट होते का? की निर्ढावलेल्या मद्यपींसाठी कडक उपाय करावे लागतात हे चित्र लवकरच स्पष्ट होईल.

Advertisement