जाहिरात

पुण्यातील 42 बांगलादेशी नागरिकांचे पासपोर्ट रद्द, 'त्या' एजंटने कसा काढून दिला भारतीय पासपोर्ट?

पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पासपोर्ट विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यातील 42 बांगलादेशी नागरिकांचे पासपोर्ट रद्द, 'त्या' एजंटने कसा काढून दिला भारतीय पासपोर्ट?
मुंबई:

पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पासपोर्ट विभागाकडून अनधिकृतपणे राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्राच्या आधारे मिळवलेले 42 भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत. 

पिंपरी चिंचवड शहरातील दहशतवाद विरोधी पथक आणि निगडी पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत जानेवारी महिन्यात निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनाधिकृतरित्या वास्तव्य करत असणाऱ्या 5 बांगलादेशी घुसखोर राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांना अटक करत पुढील तपास केला असता, त्या 5 बांगलादेशी नागरिकांना ज्या एजंटने पासपोर्ट बनवण्यासाठी मदत केली त्याची सखोल चौकशी केली. त्या एजंटने आणखी 35 बांगलादेशी घुसखोरांना भारतीय पासपोर्ट मिळवून दिल्याचं समोर आलं होतं. 

नक्की वाचा - मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; गॅझेटच्या तपासणीसाठी 11 जणांची टीम हैदराबादला रवाना

त्यात एजंटसह सर्व 42 बांगलादेशी घुसखोराविरोधात जानेवारी महिन्यात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा शोध घेतला असता त्या 5 बांगलादेशी नागरिकांना एका एजंटने बनावट कागद पत्राच्या आधारे भारतीय पासपोर्ट बनवून दिला असल्याचे पोलीस तपासात समोर आलं. त्यानंतर दहशतवादी विरोधी पथक, निगडी पोलीस पासपोर्ट विभाग यांच्या संयुक्त कारवाईमध्ये ज्या एजंटकडून पासपोर्ट तयार करण्यात आलेले 42 पासपोर्ट रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. 

घुसखोरांनी भारत-बांगलादेश बॉर्डरवरून भारतात प्रवेश केल्यानंतर बॉर्डरजवळील जिल्ह्यातील शाळा सोडल्याचा बनावट दाखला, डोमिसाईल कागदपत्रे बनवली आणि त्या कागदपत्रांच्या आधारे ओरिजनल आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून घेत. त्यानंतर ते घुसखोर ओरिजनल आधारकार्ड आणि पॅनकार्डच्या आधारावर पासपोर्ट बनवून घेत होते. 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
ग्राहकांच्या 'त्या' यादीवरुन वाधवान यांची IBBI कडे धाव; ग्राहकांनी मात्र फेटाळले सर्व दावे
पुण्यातील 42 बांगलादेशी नागरिकांचे पासपोर्ट रद्द, 'त्या' एजंटने कसा काढून दिला भारतीय पासपोर्ट?
Citizens protest in the case of sexual abuse of school children in Badlapur
Next Article
चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी बदलापूरकर संतप्त; शाळेच्या गेटवर पालकांसह नागरिकांना रोखलं