पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपीच्या ब्लड रिपोर्टबद्दल मोठा खुलासा; ससूनमधील 2 डॉक्टरांना अटक

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Advertisement
Read Time: 1 min
पुणे:

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कार चालविणारा अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या अहवालाचा फेरफार करण्याचा आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांच्या तपासात ही माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपी मुलाचा रक्ताचा अहवाल ससून रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला होता. परंतु रक्ताच्या अहवालात फेरफार करण्यात आले आहेत, असा आरोप करीत पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे यांना अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या रक्ताच्या अहवालात फेरफार केल्याप्रकरणी तावरे यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय डॉक्टर श्रीहरी हरलोर यांना देखील पुणे पोलिसांनी अटक केली आहे. 

नक्की वाचा - 'पोर्शे, माझी आवडती कार', 'माझा बाप बिल्डर असता तर'; पुण्यात काँग्रेसकडून निबंध स्पर्धेचं आयोजन

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्या प्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री उशीरा अटक केली. ड्रग तस्कर ललीत पाटील प्रकरणात देखील ससून रुणालयातील डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता दोन डॉक्टरांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यामुळे ससून रुग्णालयाच्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या प्रशासनावर अनेक सवाल उपस्थित होवू लागले आहेत .

Advertisement