पुण्यातील नामांकित आयटी कंपनीमध्ये एका तरुणीवर धारदार कोयत्याने हल्ला केला. यात तरुणीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पुण्यात खळबळ उडाली आहे. हत्या करण्यात आलेल्या तरुणीचं नाव शुभदा कोदारे (28 वर्षे) असल्याचं समोर आलं आहे. शुभदा हिचा तिच्याच सहकाऱ्यासोबत पैशांवरुन वाद झाला होता. यातूनच शुभदा ऑफिस सुटल्यानंतर पार्किंगमधून गाडी काढण्यासाठी गेली असता तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यानंतर शुभदाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्याने शुभदाचा मृत्यू झाला.
नक्की वाचा - Honor killing : छ्त्रपती संभाजीनगरमध्ये 'सैराट'ची पुनरावृत्ती, 17 वर्षीय मुलीला भावानेच डोंगरावरून ढकलून संपवलं
या प्रकरणात आरोपी कृष्णा सत्यनारायण कनोजा (30 वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. पु्ण्यातील येरवडा भागातील एका आयटी कंपनीत ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही एकमेकांच्या ओळखीचे होते. त्यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण झाली होती. मंगळवारी ७ जानेवारीला शुभदा ऑफिसमधून निघाली. ती पार्किंगमधून गाडी काढत असताना कृष्णा कनोजा तेथे आला व त्याने शुभदावर धारदार शस्त्राने हल्ला केला.