Pune Crime : सरपंचाच्या पतीकडून ज्येष्ठाची 6 कोटींची लूट, डिजिटल अटकेचीची भीती दाखवित आणखी 5 जाळ्यात 

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ व्यक्तीने शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

जाहिरात
Read Time: 2 mins

मनी लाँड्रिंग व्यवहारात डिजिटल अटक करण्याची भीती दाखवून पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची सहा कोटी 29 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर चोरट्याला पनवेल परिसरातून अटक करण्यात आली. सायबर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, चोराने डिजिटल अटकेची भीती दाखवून पाच जणांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. आरोपी बांधकाम व्यावसायिक आहे.  तर त्याची पत्नी राजकीय पक्षाची कार्यकर्ता असून ती सरपंच आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तुषार हरिश्चंद्र वाजंत्री (28 वय) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वाजंत्रीने पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर मागील वर्षी संपर्क साधून पोलीस असल्याची बतावणी केली. मनी लाँड्रिंग प्रकरणी कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाला तातडीने पैसे पाठविण्यास सांगितले. 

नक्की वाचा - Bhiwandi News : भिवंडी मानकोली वाहतूक शाखेकडून दिवसाला 12 लाखांची लूट? स्टिंग ऑपरेशनमध्ये धक्कादायक प्रकार उघड


9 ते 19 नोव्हेंबरदरम्यान ज्येष्ठ व्यक्तीने वाजंत्री याच्या बँक खात्यात सहा कोटी 29 लाख रुपये जमा केले. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सायबर पोलिसांना ती रक्कम वाजंत्रीच्या खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले. आरोपीने त्यातील 90 लाख आणि 20 लाख रुपये एका बँकेत मुदतठेव स्वरूपात ठेवले होते. 

Advertisement

संबंधित बँक खाते कोकबन येथील धावीर कन्स्ट्रक्शनचे असल्याचे उघड झाले. त्यानंतर सायबर पोलिसांचे पथक आरोपी आणि साथीदाराला ताब्यात घेण्यासाठी कोकबन येथे आल्याची चाहुल लागताच तो पसार झाला. वाजंत्री पनवेलमध्ये असल्याची माहिती खबऱ्याने दिल्यावर सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. 

Topics mentioned in this article