जाहिरात

Pune Shivshahi Crime : पुणे हादरलं! स्वारगेट बस स्टँडवरील शिवशाहीत तरुणीवर अत्याचार

पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत हा भयावह प्रकार घडला.

Pune Shivshahi Crime : पुणे हादरलं! स्वारगेट बस स्टँडवरील शिवशाहीत तरुणीवर अत्याचार

Pune Shivshahi Crime : पुणं हे तरुणांचं शहर म्हणूनही ओळखलं जातं. हे शहर कधीच झोपत नाही. रात्रीसुद्धा पुणे जागं असतं असं म्हणतात. मात्र तरुणांच्या या पुण्यात पहाटेच्या वेळी एक थरकाप उडवणारा प्रकार घडला. तेदेखील कायम गर्दीमय असलेल्या स्वारगेट एसटी स्टँडवर. येथून विविध जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी एसटी, शिवशाही आणि शिवनेरी बस सुटतात. त्यामुळे येथे कायम मोठी वर्दळ असते. येथेच पहाटेच्या वेळी बस पकडण्यासाठी आलेल्या एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पुण्यात शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची भीषण घटना उघडकीस आली आहे. ही तरुणी पुण्याहून फलटणच्या दिशेने निघाली होती. त्यासाठी ती स्वारगेटवर बस पकडण्यासाठी आली होती. त्यावेळी सकाळचे 5.30 झाले होते. त्यावेळी दत्तात्रय रामदास गाडे नावाच्या व्यक्तीने तिच्यावर उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार केल्याची माहिती आहे.

Vision and Nation Building : शिवरायांवर पदव्युत्तर शिक्षण, पुणे विद्यापीठात नवा अभ्यासक्रम कधीपासून सुरू होणार? प्रवेश कसा घ्याल?

नक्की वाचा - Vision and Nation Building : शिवरायांवर पदव्युत्तर शिक्षण, पुणे विद्यापीठात नवा अभ्यासक्रम कधीपासून सुरू होणार? प्रवेश कसा घ्याल?

धक्कादायक बाब म्हणजे कायम वर्दळ असलेल्या स्वारगेट एसटी स्टँडवर हा प्रकार घडला. आज 26 फेब्रुवारी रोजी पहाटे 5.30 वाजता ही घटना घडल्याची माहिती आहे. पोलिसांच एक पथक आरोपीच्या शोधत असून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत हा भयावह प्रकार घडला. पुणे पोलिसांकडून फरार आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याचा शोध सुरू आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: