जाहिरात

'बायको त्रास देते,मारहाण करते', Video शूट करुन नवऱ्यानं संपवलं आयुष्य, पुण्यातील धक्कादायक घटना

Pune News : पुण्यातील कोरेगाव मुळमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीनं स्वत:चं आयुष्य संपवलं आहे.

'बायको त्रास देते,मारहाण करते', Video शूट करुन नवऱ्यानं संपवलं आयुष्य, पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे:

अविनाश पवार, प्रतिनिधी

पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेच्या मृत्यूचं प्रकरण अद्याप ताजं आहे. सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी छळ केल्यानं वैष्णवीनं आयुष्याचा शेवट केला. वैष्णवीनं आत्महत्या केली की तिची हत्या झाली याबाबत सध्या तपास सुरु आहे. राज्यातील अन्य भागातही विवाहित महिलांना होणाऱ्या त्रासाच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये उघड झाल्या आहेत. त्याचवेळी पुण्यात मात्र एक वेगळं आणि तितकंच धक्कादायक प्रकरण घडलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

पुण्यातील कोरेगाव मुळमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीनं आत्महत्या केली आहे. सूरज पवार (वय 32) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्यानं बुधवारी स्वत:चं आयुष्य संपवलं. सूरजनं आत्महत्येपूर्वी स्वत:च्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत त्याला होत असलेल्या त्रासाची माहिती रेकॉर्ड केली आहे, अशी माहिती समोर आली आहे. 

( नक्की वाचा : मुलगा नाही, पैसे आण... सासरच्या त्रासाला कंटाळून 5 वर्षांच्या मुलीसह विवाहितेचं टोकाचं पाऊल! )

या प्रकरणी सूरजची पत्नी मयुरी पवार उर्फ मयुरी जाधव (वय 26 ) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आला आहे. सततच्या भांडणामुळे आणि मारहाणीमुळे सूरज आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला, असा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. सुरज आणि मयुरी यांचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. ते लग्नानंतर कोरेगाव मूळ येथील इनामदार वस्तीत राहत होते. बुधवारी किरकोळ कारणांमुळे दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं, अशी तक्रार सूरजच्या वडिलांनी केली आहे. 

या प्रकरणात पोलिसांनी भारतीय दंड संविधान कलम 108, 118(1), 115(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
 

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com