पिंपरी चिंचवडच्या डी. वाय. पाटील इंजिनिअरींग कॉलेजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये शुल्लक कारणावरून थेट एकमेकां विरूद्ध कोयते उगारले गेले आहेत. एकमेकांकडे बघितल्यामुळे आणि फोनवर मोठ्या आवाजात बोलत असल्यामुळे हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कॉलेजमध्ये नक्की काय घडलं?
डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये हा प्रकार घडला आहे. इंजिनियरिंगचा पेपर कॉलेजमध्ये होता. पेपर झाल्यानंतर विद्यार्थी घरी जात होते. यावेळी यातील काही तरुण त्याठिकाणी बसून फोनवर मोठ्याने बोलत होते. त्याच वेळी तिथे दुसरा ग्रुपही होता. फोनवर बोलणे आणि शिवाय एकमेकांकडे पाहाणे हे दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांना खटकले. त्या पैकी एकाने मागचा पुढचा विचार न करता त्याच्याकडील कोयता बाहेर काढला. कोयता घेऊन तो समोरच्या विद्यार्थांवर धावून गेला. मात्र काही भयंकर होण्याच्या आताच त्याला सर्वांनी धरला. या संपूर्ण प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - दादांची 'दादागिरी'! 'गंमत-जंमत कराल तर याद राखा, तुमचा बंदोबस्तच करेन'
कोयता उगारणारे ते कोण?
दरम्यान कॉलेजमध्ये राडा करणारे ते तरूण कोण होते याचा तपास पोलिसांनी लावला आहे. याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचे ते मित्र होते. जवळपास 5 ते 7 जण त्या ग्रुपमध्ये होते. त्यापैकी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. तर इतर आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा - नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणात आज निकाल, 11 वर्षांनंतर तरी न्याय मिळणार?
पुण्यात कोयता गँगची दहशत
पुण्यात गेल्या काही दिवसापासून कोयता गँगची दहशत दिसून आली आहे. हॉटेल असतील तर दागिन्यांची दुकाने असतील, मॉल असतील अशा ठिकाणी या कोयता गँगने आपली दहशत माजवली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या परिसरात ही दहशत दिसून आली आहे. त्यात आता कॉलेजमध्येही कोयता दाखवला गेल्याने पुण्यात नक्की चाललंय तरी काय असा प्रश्न विचारला जातोय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world