जाहिरात

Pune News: न सांगता दोन दिवसाची सुट्टी घेतली, हेल्परसोबत हॉटेल मॅनेजरने केला भयंकर प्रकार

निलेश कामावर आला नाही त्यामुळे त्याच्या कामाचा ताण अन्य स्टाफवर पडला होता.

Pune News: न सांगता दोन दिवसाची सुट्टी घेतली, हेल्परसोबत हॉटेल मॅनेजरने केला भयंकर प्रकार
  • पिंपरी-चिंचवडमधील एका हॉटेलमध्ये हेल्पर निलेश मनोहरेंला अमानवी मारहाण झाली आहे
  • हॉटेल मॅनेजर महेश शेट्टीने निलेशला उगडं करून प्लास्टीकच्या पाईपने मारहाण केली
  • निलेशने दोन दिवस कामाला न येण्यामुळे हॉटेलमध्ये ताण निर्माण झाला होता
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

सुरज कसबे

पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथं एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या हेल्परला न सांगता सुट्टी घेणं चांगलंच महागात पडलं आहे. सुट्टी संपल्यानंतर तो पुन्हा जेव्हा हॉटेलमध्ये कामाला आला त्यावेळ हॉटेल मॅनेजरने त्याच्या सोबत अमानवी प्रकार केला. त्याला उगडं करून प्लास्टीकच्या पाईपने मारहाण करण्यात आली. त्याला इतकी मारहाण झाली की त्याच्या पाठीवर त्या पाईपचे व्रण अमटले. ही बाब समोर आल्यानंतर प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचले. मात्र त्यात ही समज देवून हे प्रकरण तिथेच मिटवण्यात आलं आहे.  

वाकड इथं की-इन हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये निलेश मनोहरे हा कामाला आहे. तो हॉटेलमध्ये हेल्परचे काम करतो. अनेक दिवसापासून तो इथं काम करत असल्याचं ही समोर आलं आहे. काही कारणास्तव त्याने दोन दिवस कामाला दांडी मारली. तो कामावर न सांगता गेलाच नाही. त्यामुळे तो कुठे आहे असा प्रश्न हॉटेल मॅनेजरला पडला होता. शिवाय न सांगता कामावर आला नाही त्याचा राग त्याच्या मनात होता.

नक्की वाचा - Dharashiv News: शिंदेंची शिवसेना भाजपच्या आमदाराने केली हायजॅक? ‘ऑडिओ बॉम्ब' ने खळबळ

निलेश कामावर आला नाही त्यामुळे त्याच्या कामाचा ताण अन्य स्टाफवर पडला होता. त्यामुळे तो कधी कामावर येतोय याकडेच हॉटेलचा मॅनेजर असलेल्या महेश शेट्टी याचे लक्ष लागले होते. दोन दिवसानंतर निलेश कामावर परतला. तो कामावर येताच शेट्टीने आपला राग निलेशवर काढला. त्याला पाईपने बेदम मारहाण केली आहे. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 

नक्की वाचा - Pune News: पुण्यात किती उमेदवारांची डिपॉझिट झाले जप्त? डिपॉझिट जप्त होणारे सर्वाधिक उमेदवार कोणत्या पक्षाचे?

त्याला अतिशय अमानुष पणे मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश मनोहरेने आपल्याला मारहाण झाल्याचे सांगितले आहे. त्याच्या पाठीवर मारहाणीचे व्रण स्पष्ट पणे दिसत आहेत. या प्रकरणी हॉटेल मॅनेजर महेश शेट्टी याला वाकड पोलिसांनी नोटीस बजावत समज दिली आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जातोय. तर निलेश मनोहरे हा मद्यपान करून नोकरीवर येत असल्याचा आरोप देखील हॉटेल प्रशासनाने केला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com