जाहिरात

सहलीला म्हणून आली अन् प्रियकरासोबत पळाली, पण पुढे जावून 'अशी'अडकली

शिक्षकांनी महाड पोलिस स्टेशन तातडीने गाठले. पोलिसांनी ही तेवढ्याच वेगाने सुत्र हलवली. त्यानंतर वेगळाच प्रकार उघडकीस आला.

सहलीला म्हणून आली अन् प्रियकरासोबत पळाली, पण पुढे जावून 'अशी'अडकली
रायगड:

जामनेर येथील शाळेची सहल रायगड किल्ला पहाण्यासाठी आली आली होती. मात्र किल्ला पाहणं राहीलं बाजूला या सहलीला एक वेगळेच वळण लागले. सहलीला आलेली एक विद्यार्थिनी अचानक गायब झाली. ज्या वेळी विद्यार्थांनी गणना केली जात होती त्यावेळी एक विद्यार्थ्यांनी कमी असल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांचे धाबेच दणाणले. त्यांनी आजूबाजूला शोधाशोध केली. पण ती काही सापडली नाही. त्यामुळे शिक्षकांनी महाड पोलिस स्टेशन तातडीने गाठले. पोलिसांनी ही तेवढ्याच वेगाने सुत्र हलवली. त्यानंतर वेगळाच प्रकार उघडकीस आला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जळगाव जिल्ह्यातील जामनेर इथल्या एका शाळेची सहल रायगड किल्ला पाहाण्यासाठी आली होती. किल्ला पाहून झाल्यानंतर सर्व विद्यार्थी रोप वे ने खाली उतरले. त्यावेळी एक विद्यार्थिनी कमी असल्याचे शिक्षकांना दिसले. तिच्या मैत्रिणींकडे शिक्षकांनी विचारणा केली. त्यावर तुम्ही पुढे जा मी मागून येते असं तिने आपल्याला सांगितल्याचे मैत्रिणींनी शिक्षकांना सांगितले. त्याच वेळी  काही तरी गडबड असल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले. 

ट्रेंडिंग बातमी - तळीराम मुख्याध्यापक, शाळेतच झिंग झिंग झिंगाट, गावकरी आले अन्...

अधिकचा उशिर न करता शिक्षकांना महाड पोलिस स्टेशन गाठले. झालेली सर्व हकीगत पोलिसांना सांगितली. शिवाय त्या विद्यार्थिनीचा फोन क्रमांकही पोलिसांना दिला. त्यानंतर पोलिसांनी जलदगतीन आपली सुत्र हलवली. त्यांनी त्या मुलीचा मोबाईल ट्रेस केला. त्यानंतर ती पुण्याच्या दिशेने जात असल्याचे समजले. ती ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणच्या पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर त्या विद्यार्थिनीला पकडण्यात आलं. 

ट्रेंडिंग बातमी - सावरकर ते द्रोणाचार्य! संविधानावरील चर्चेतून राहुल गांधींकडून भाजपची कोंडी

तिला पकडल्यानंतर वेगळच प्रकरण समोर आलं. ती ज्या बसमधून आली होती. त्याच बसचा पाठलाग तेजस पाटील हा 19 वर्षाचा तरूण करत होता. तो जामनेरवरून त्या बसचा बाईकवरून पाठलाग करत होता. रायगड इथं पोहोचल्यानंतर तो त्या विद्यार्थिनीला घेवून पुण्याच्या दिशेने चालला होता. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. शिवाय तेजस याच्या विरोधात अपहरणाचा ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com