जाहिरात

सोनम रघुवंशी 10 महिन्यानंतर जेल बाहेर येणार, 'या' 3 कारणाने मिळाला जामीन, बाकीच्या आरोपींचं काय?

आज कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सोनम आपल्या कुटुंबीयांसह इंदूरला रवाना होऊ शकते.

सोनम रघुवंशी 10 महिन्यानंतर जेल बाहेर येणार, 'या' 3 कारणाने मिळाला जामीन, बाकीच्या आरोपींचं काय?
  • राजा रघुवंशी हनीमून मर्डर प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशीला मेघालय न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे
  • सोनमने न्यायालयात तीन महत्त्वाचे मुद्दे मांडले असून तपास पूर्ण होऊन पोलिसांना सहकार्य केल्याचे सांगितले आहे
  • राजा रघुवंशी यांच्या हत्येमागे सोनम आणि तिचा कथित प्रियकर राज कुशवाहा यांचा कट असल्याचे दोषारोपपत्रात नमूद आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Raja Raghuvanshi Murder Case: देशभर गाजलेल्या इंदूरच्या राजा रघुवंशी 'हनीमून मर्डर केस'मध्ये आता एक मोठी कायदेशीर घडामोड समोर आली आहे. या खळबळजनक हत्याकांडातील मुख्य आरोपी आणि राजाची पत्नी सोनम रघुवंशी हिला जामीन मंजूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मेघालयच्या ईस्ट खासी हिल्स जिल्हा आणि सत्र न्यायालयात कायदेशीर मदत कक्षाद्वारे (Legal Aid Cell) जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावरील सुनावणीनंतर सोनमच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.

केवळ सोनमचाच जामीन अर्ज
मिळालेल्या माहितीनुसार, या हत्याकांडातील इतर आरोपी राज कुशवाहा, आकाश राजपूत, आनंद कुर्मी आणि विशाल सिंह चौहान यांच्या वतीने अद्याप कोणताही जामीन अर्ज न्यायालयात सादर करण्यात आलेला नाही. केवळ सोनम रघुवंशीनेच पुढाकार घेत जामिनासाठी अर्ज केला होता. सोनमचे वडील आणि चुलत भाऊ सध्या शिलाँगमध्ये असून जामिनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि बाँड सादर करण्याची तयारी सुरू आहे.

नक्की वाचा - Shocking news: गर्भपातासाठी आली अन् अचानक तब्बेत खालावली! अलिशान 'बंगल्या'चं खतरनाक राज उघडलं

जामीन मिळण्याची ३ मुख्य कारणे
सोनमच्या वतीने न्यायालयात प्रामुख्याने तीन महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले. त्यात तिने या प्रकरणाचा तपास आता पूर्ण झाला आहे. पोलिसांनी न्यायालयात 790 पानांचे दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे असं तिने कोर्टाला सांगितलं आहे. सोनमने तपासादरम्यान पोलिसांना पूर्ण सहकार्य केले असून भविष्यातही ती सहकार्य करेल, अशी ग्वाही देण्यात आली आहे. त्याच बरोबर सोनम गेल्या 10 महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. या मुद्द्यावरही न्यायालयाने सहानुभूतीपूर्वक विचार केल्याचे समजते, अशा स्थितीत जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

प्रेमसंबंधातून पतीची हत्या
मेघालय पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रानुसार, राजा रघुवंशी यांच्या हत्येचा कट त्यांची पत्नी सोनम आणि तिचा कथित प्रियकर राज कुशवाहा यांनी रचला होता. इतर तीन आरोपींनी त्यांना या गुन्ह्यात मदत केली. हनीमूनसाठी गेलेल्या राजाची मेघालयमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. कॉल डिटेल्स आणि लोकेशन डेटाच्या आधारे पोलिसांनी हा कट उघडकीस आणला होता. आता या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी सोनम रघुवंशी हिला अखेर जामीन मंजूर झाला आहे. राजा रघुवंशी यांच्या हत्येमागे प्रेमसंबंधांची किनार असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. आज संध्याकाळपर्यंत सोनमची कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा - Palghar News: सचिन तेंडुलकरचा पालघरमध्ये मास्टरस्ट्रोक! गुहिर गावात काही तरी वेगळं होतय, जाणून तुम्ही ही...

प्रसिद्ध उद्योजक राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील आरोपी सोनम रघुवंशी हिची 10 महिन्यांनंतर तुरुंगातून सुटका होणार आहे. मेघालय पोलिसांनी तपास पूर्ण करून चार्जशीट दाखल केल्यामुळे न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला. सोनमने तपासात सहकार्य केल्याचा दावा तिच्या वकिलांनी केला होता. या हत्येतील इतर चार आरोपींनी अद्याप जामीन अर्ज दाखल केलेला नाही, त्यामुळे ते अद्याप तुरुंगातच आहेत. पतीची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली या सर्वांवर गुन्हे दाखल आहेत. आज कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सोनम आपल्या कुटुंबीयांसह इंदूरला रवाना होऊ शकते.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com