पालघर येथे उभ्या केलेल्या प्रकल्पामुळे राकेश वाधवान वादात अडकले आहेत. घरांचा ताबा मिळाल्यानंतरही घरमालकांनी खोटा आरोप केल्याचा दावा एचडीआयएल कंपनीचे (HDIL) निलंबित संचालक राकेश वाधवान यांनी केला असून त्यांनी आयबीबीआयचं दार ठोठावलं आहे. दरम्यान राकेश वाधवान यांना न्यायालयाने देखील दिलासा दिला असून त्यांचा जामीन मंजूर करण्यात आली आहे. मात्र वाधवान यांनी फसवल्याचा आरोप ज्या ग्राहकांकडून करण्यात आला, त्यांना पैसे परत करण्याचा ठराव प्रशासनाने केला आहे. याच संदर्भात वाधवान यांनी आयबीबीआयकडे धाव घेतली आहे.
एचडीआयएल या कंपनीने पालघर येथे पॅराडाईज सिटी इमारत प्रकल्पाचं बांधकाम केलं आहे. या प्रकल्पानुसार, ग्राहकांना ठरवल्यानुसार सर्व देण्यात आले तरी देखील घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी खोटे आरोप केल्याचा दावा वाधवान यांनी केला आहे. त्यामुळे या इमारतीचा कारभार बघण्यासाठी कंपनी प्रशासक नेमण्यात आला. कंपनी प्रशासक अभय मनुधाने यांनी एक ठराव केला. यामध्ये राकेश यांनी ग्राहकांच्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची परतफेड करावी असे सांगण्यात आले.
नक्की वाचा - कोल्हापूरच्या उद्योजकाला केली डिजिटल अरेस्ट, पुढे जे घडलं ते भयंकर
मात्र यासंदर्भात राकेश वाधवान यांनी थेट आयबीबीआयकडे तक्रार केली आहे. यावेळी इमारतीचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ओसीचे पेपर देण्यात आले होते. फेज एकमधील घर ग्राहकांनी त्यांच्या सोसायटीची स्थापना देखील केली आहे. अनेक ग्राहकांना त्यांच्या घराचा ताबा घेण्यात आल्याचा दावा वाधवान यांनी केला आहे. अनेक ग्राहकांनी नवीन घरात गृहप्रवेश देखील केला असल्याचा दावा वाधवान यांनी केला आहे.
हे ही वाचा - एक सही अन् ससूनचे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात; पुण्यात 4 कोटींचा फ्रॉड, 25 जणांवर कारवाई!
याशिवाय घर तयार असून सुद्धा काही ग्राहकांनी आपली घरे ताब्यात घेतलेली नाहीत. अशांची नावं देखील या यादीत समाविष्ट करण्यात आल्याचा दावा वाधवान यांनी केला आहे. यादीत खोटी नावे समाविष्ट करत कंपनीचे कर्ज वाढवण्याचे काम केल्याचा आरोप वाधवान करत आहेत. राकेश वाधवान यांनी आयबीबीआय बोर्डाकडे छोट्या कर्जदारांची नावे लिस्टमधून काढून टाकण्याची मागणी केली असून या संदर्भात बोर्ड लवकरच सुनावणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान ग्राहकांनी देखील केवळ घराच्या दारावर नेमप्लेट लावली म्हणजे ते घर आपले होत नसल्याचे सांगत त्यांनी वाधवान यांनी केलेलं दावे फेटाळून लावले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world