Kannada Actor Darshan Viral Photos: बंगळुरूच्या तुरुंगामध्ये कैद असलेला अभिनेता दर्शनचा धक्कादायक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारागृहातही दर्शनला व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचे या फोटोच्या माध्यमातून दिसत आहे. कारागृहातील मोकळ्या जागेवर दर्शन तीन लोकांसोबत सिगारेट ओढत असतानाचा फोटो व्हायरल झाला आणि यानंतर एक व्हिडीओही देखील समोर आला आहे. ज्यामध्ये कन्नड अभिनेता दर्शन फोनवर बोलताना दिसत आहे. NDTV या व्हिडीओची पुष्टी करत नाही.
(नक्की वाचा: दात पडले तरी काम करतात, तरुणांच्या संधी हिरावतात! मंत्र्याची रजनीकांत यांच्यावर जहरी टीका)
फोटोनंतर व्हिडीओ आला समोर
व्हिडीओच्या सुरुवातीला, पिवळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये एक माणूस दुसरीकडे पाहून हसत हसत पुढे जातो. यानंतर दुसरा व्यक्ती त्याचा फोन घेऊन पुढे येतो आणि कॅमेरा आपल्या चेहऱ्यावरून दूर नेऊन दुसऱ्या व्यक्तीकडे फोन देतो. यानंतर व्हिडीओमध्ये दर्शनचा चेहरा दिसतोय. व्हिडीओ कॉलमधील व्यक्ती दर्शनने काही खाल्ले का? असे विचारत असल्याचे दिसतंय. यावर दर्शन हसून हो असे उत्तर देतो. थोडा वेळ संभाषण केल्यानंतर दोघंही फोन ठेवतात.
25 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये दर्शन एका चांगल्या खोलीमध्ये बसलेला दिसत आहे. त्याच्या मागील बाजूस भिंतीवर मोठे पडदे लावले आहेत आणि काही कपडे देखील दिसत आहेत. रेणुका स्वामी हत्याकांड प्रकरणामध्ये दर्शनला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 9 जूनला बंगळुरूमध्ये एका नाल्याजवळ रेणुका स्वामीचा मृतदेह संशयस्पदरित्या आढळला होता.
आधी फोटो झाला होता व्हायरल
दर्शनचा रविवारी (25 ऑगस्ट) एक फोटो देखील व्हायरल झाला होता. ज्यामध्ये कथित स्वरुपात दर्शन कारागृहाच्या मोकळ्या जागेत गँगस्टर विल्सन गार्डन नागा आणि त्याच्या मॅनेजरसह तीन लोकांसोबत बसल्याचे दिसत आहे.
(नक्की वाचा: चित्रपटाच्या बदल्यात लैंगिक शोषण, एन्ट्रीसाठी कोड नेम! सिनेमाच्या सर्वात 'डर्टी पिक्चर'च काळं सत्य)
रेणुका स्वामीचे वडील काय म्हणाले...
कारागृह प्रशासनाला या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेणुका स्वामीच्या वडिलांनी सीबीआय चौकशीची करण्याची आणि संबंधितांना शिक्षा करण्याचीही मागणी केली आहे. ते म्हणाले, "सीबीआय चौकशी होणे गरजेचे आहे. फोटोमध्ये त्याला (दर्शन) सिगारेट हातात घेऊन इतरांसोबत चहा पिताना पाहून धक्का बसला. तो तुरुंगात आहे की नाही? याबाबत आम्हाला शंका आहे. तुरुंग तुरुंगाप्रमाणेच राहिले पाहिजे. त्याला सामान्य कैद्याप्रमाणेच वागणूक मिळावी, पण तो एखाद्या रिसॉर्टमध्ये बसल्यासारखे दिसत आहे".
बदलापूर अत्याचार प्रकरण : आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची पोलीस कोठडी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world