Road Accident : बहुतांश बाईकस्वार हा नियम मोडतात, एक चूक अन् मीरज-कोल्हापूर रस्त्यावर तरुणाचा मृत्यू

दुचाकी चालवताना केलेल्या एका चुकीमुळे तरुणाने आपला जीव गमावला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

दुचाकी चालवताना केलेल्या एका चुकीमुळे तरुणाने आपला जीव गमावला आहे. मीरज-कोल्हापूर रस्त्यावर हा भीषण अपघात घडला आहे. मीरज-कोल्हापूर रस्त्यावर मोटारसायकल आणि चारचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात मोटर सायकलस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. जमीर ताजुद्दीन मुजावर (वय 27) असं मृत तरुणाचं नाव आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रात्रीच्या दरम्यान मृत जमीर हा त्याच्या मोटारसायकलवरून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जात होता. अनेकजण रस्त्याच्या विरुद्ध दिशेने दुचाकी घेऊन जात असतात. वेळ वाचविण्यासाठी अनेकजणं रस्त्याच्या विरुद्ध दिशेने गाडी किंवा दुचाकी चालवत असतात. जमीरदेखील रस्त्याच्या विरुद्ध दिशेने दुचाकीवर जात असताना हा अपघात घडला.

नक्की वाचा - Ulhasnagar Crime: लग्नात बाऊंसर देण्यावरुन राडा, तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; आरोपी फरार

समोरून येणाऱ्या भरधाव चारचाकीला त्याच्या मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक बसली. धडक इतकी जोरात  होती की, मोटरसायकलवरून जमीर रस्त्याच्या बाजूला पडला. यानंतर तो जागीच ठार  झाला. तरुणाचा मृतदेह मीरजेच्या शासकीय रुग्णालयात शव विच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे.

Advertisement