
निनाद करमारकर, मुंबई: नातेवाईकांच्या लग्नात बाऊंसर दिले नाही म्हणून एका बॉडीगार्ड तरुणाला मारहाण झाल्याची घटना उल्हासनगर जवळील आशेळे पाडा भागात घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून आरोपी हे फरार झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, राजू साव असं जखमी झालेल्या बॉडीगार्ड तरुणाचं नाव आहे. राजू हा आशेळे पाडा भागात वास्तव्याला असून बाऊंसर म्हणून काम करतो. आशेळे पाड्यातील स्वप्नील कडू याच्या नातेवाईकांना लग्नात दोन बाऊंसर दिले नाही म्हणून आरोपी स्वप्नील कडू, बंटी आणि गोट्या यांनी राजू साव याला लोखंडी रॉड आणि कंबरेच्या पट्ट्याने तीन जणांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आरोपी स्वप्नील कडू, बंटी आणि गोट्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे तिघे फरार झाले आहेत.
दुसरीकडे, गाडीचे नुकसान केल्याचा आरोप करत झालेल्या वादातून दोन तरुणांनी एका महिलेसह तिच्या मुलाला मारहाण केली. यानंतर स्थानिकांनी या दोघांना चोप दिला. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडगोळवली भागात ही हाणामारीची घटना घडली.
नक्की वाचा - Kalyan : नवव्या वर्षी बेपत्ता झाली मुलगी, दोन मुलांची आई होऊन घरी परतली! कल्याणमधील धक्कादायक प्रकार
एका इमारतीसमोर लावलेल्या दुचाकीचं नुकसान झाल्याचा आरोप करत वाद झाला आणि या वादातून एक महिला आणि तिचा मुलगा यांच्याशी दोन तरुणांची हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्हीकडून एकमेकांना मारहाण करण्यात आली. या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, तरुणांनी महिलेला मारहाण करण्याचा प्रयत्न करताच स्थानिकांनी या तरुणांना चोप दिला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world