मुलांच्या किंकाळ्या, पर्यटकांचा आक्रोश; सापुतारा बस अपघाताचा हादरवणारा Live Video

Saputara Bus Accident : सुरतला जाणाऱ्या या बसमधील प्रवासी Video शूट करतानाच बसचा अपघात झाला.

Advertisement
Read Time: 2 mins
सापुतारा:

रविवारी गुजरातमधील (Saputara Bus Accident) सापुतारा या पर्यटनस्थळावर मोठा अपघात घडला होता. 57 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसच्या अपघातात दोन मुलांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्याशिवाय 8 हून अधिक जणं गंभीर जखमी झाले होते. दरम्यान या अपघाताचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर (Saputara Bus Accident Video) आला आहे. या व्हिडिओमध्ये अपघाताचं कारण समोर आलं आहे. 

ही बस सापुताऱ्याहून सुरतच्या दिशेने जात होती. यावेळी सापुतारा घाटाजवळील खोल दरीत ही बस 57 पर्यटकांना घेऊन कोसळली. समोर आलेल्या नव्या व्हिडिओमध्ये बसमध्ये बसलेली एक व्यक्ती व्हिडिओ शूट करीत असल्याचं दिसत आहे.  चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस दरीत गेल्याचं दिसत आहे. अपघातानंतर बसमध्ये एकच गोंधळ उडाला. बसमधील लोक आरडाओरडा करीत होते. लहान मुलांचा रडताना आवाज ऐकू येत आहे.  

नक्की वाचा - नवरा कामावरून आला अन् मित्रांसोबत फिरायला गेला; चिडलेल्या पत्नीने एका क्षणात सर्व संपवलं!

सुदैवाने ही बस खोल दरीत कोसळली नाही. तर वरच झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र या अपघातात दोन बालकं ठार झाली असून आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही लक्झरी बस सुरत येथील बाप्पा सिताराम ट्रॅव्हल्स कंपनीची आहे. सर्व जखमींवर सुरत येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सापुतारा येथे रविवारी सायंकाळी हा अपघात घडला.