जाहिरात

Satara Doctor Suicide Case: आरोपी PSI बदनेचं शेवटचं लोकेशन सापडलं, पोलिसांकडून शोध सुरू

Satara Doctor Suicide Case : गोपाल बदनेचा पोलीस पंढरपुरात शोध घेत आहे. निलंबित पीएसआय गोपाल बदने यांचा शेवटचे लोकेशन पंढरपुरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

Satara Doctor Suicide Case: आरोपी PSI बदनेचं शेवटचं लोकेशन सापडलं, पोलिसांकडून शोध सुरू

Satara News : साताऱ्यातील फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्रशांत बनकरला पोलिसांना पुण्यातून अटक केली आहे. तर प्रमुख आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने अजूनही फरार आहे. गोपाल बदनेचं शेवटचं लोकेशन पोलिसंना सापडलं आहे. 

गोपाल बदनेचा पोलीस पंढरपुरात शोध घेत आहे. निलंबित पीएसआय गोपाल बदने यांचा शेवटचे लोकेशन पंढरपुरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पंढरपूर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. काल रात्री गोपाल बदने याचे लोकेशन पंढरपुरात होते.  गोपाल बदनेने आपल्यावर वारंवार बलात्कार केल्याचा उल्लेख तरुणीने सुसाईड नोटमध्ये केला आहे.

(नक्की वाचा- Satara Doctor Suicide Case: डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला अटक)

आरोपी प्रशांत बनकरला अटक

प्रशांत बनकरला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. प्रशांत बनकर आपल्या मित्राच्या फार्म हाऊसवर लपून बसला होता. प्रशांत बनकर हा पीडित डॉक्टर मुलगी राहत असलेल्या बिल्डिंग मालकाचा मुलगा आहे. तरुणीने आत्महत्येपूर्वी हातावर सुसाईड नोट लिहिली होती. त्या नोटमध्ये तिने प्रशांत बनकरचंही नाव लिहिलं होतं. प्रशांत बनकरने आपल्या शारीरिक मानसिक छळ केल्याचा आरोप डॉक्टर तरुणीने केला होता.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com