जाहिरात

Satara Crime: 'तू रात्री 3 वाजता...' 'Valentine Day'ला शिक्षकाचा विद्यार्थिनीसोबत भयंकर प्रताप, कराडमधील घटना

याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Satara Crime: 'तू रात्री 3 वाजता...'  'Valentine Day'ला शिक्षकाचा विद्यार्थिनीसोबत भयंकर प्रताप, कराडमधील घटना

राहुल तपासे, सातारा

School Teacher Prapose Student:  गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. व्हॅलेंटाईन डे दिवशी शिक्षकानेच विद्यार्थिनीला प्रपोज केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

शिक्षकाकडून विद्यार्थिनीला प्रपोज

समोर आलेल्या माहितीनुसार,  शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील मलकापूर शहरात व्हॅलेंटाईनडेला  घडली आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला एका शिक्षकानेच ‘प्रपोज' करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ajit Pawar: मोठा खुलासा! अजित पवारांचा मृत्यू, काही तासात 'त्या' 75 फाईलींवर सह्या; शाळांना वाटली खिरापत

'मी तुझ्यावर प्रेम करतो'

मलकापूर शहरातील एका शाळेत पीडित मुलगी नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बोलविले होते. भीतीपोटी मुलगी तीन मैत्रिणींना सोबत घेऊन बाहेर गेली. मात्र शिक्षकाने इतर तिघींना वर्गात पाठवून पीडित मुलीला थांबवले.

“मी तुला चार दिवस बोलवत होतो, तू का आली नाहीस? रात्री तीन वाजता व्हॉट्स ॲपवर ऑनलाईन का असतेस? मी तुझ्यावर प्रेम करतो,” असे म्हणत तिचा हात पकडल्याचा आरोप आहे. घाबरलेल्या मुलीने हात झटकून वर्गात धाव घेतली. ही घटना तिने मैत्रिणी व कुटुंबीयांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. रविवारी कराड शहर पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Election: राज ठाकरेंचा मोठा निर्णय! पुण्यातील पराभव जिव्हारी लागल्याने यापुढे...

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com