Ajit Pawar Death Minority Department News: बारामती येथे 28 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. मुख्यमंत्र्यांकडून शासकीय दुखवटाही जाहीर करण्यात आला. मात्र अजित पवार यांच्या मृत्यूदिवशीच राज्यात ७५ अल्पसंख्याक शाळांना अचानक अल्पसंख्याक मान्यता देण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
अजित पवारांच्या मृत्यूनंतर 75 फाईलींवर सह्या
सविस्तर वृत्त असे की, अजित पवार यांच्या मृत्यूनंतर शासकीय दुखवटा असताना राज्यात ७५ अल्पसंख्याक शाळांना अचानक अल्पसंख्याक मान्यता देण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. २८ जानेवारी रोजी या फाईलवर सही करण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कडक करवाई करावी तसेच दोषींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केली आहे..
Pune News: अजित पवारांच्या विमान अपघाताचा अंगावर काटा आणणारा नवा Video, मोठा स्फोट अन् एकच धावपळ
धक्कादायक बाब म्हणजे, पहिले प्रमाणपत्र 28 जानेवारी रोजी, अजित पवार यांच्या अपघाताच्या दिवशीच दुपारी 3 वाजून 9 मिनिटांनी देण्यात आले. राज्यात शासकीय दुखवटा सुरू असताना मंत्रालयात ही प्रक्रिया कशी आणि कोणाच्या आदेशाने राबवली गेली, असा सवाल उपस्थित होत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात शासकीय दुखवट्याचे वातावरण असतानाच अल्पसंख्याक विभागाकडून 75 शिक्षण संस्थांना घाईघाईने अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आले.
रोहित पवार संतापले
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून अल्पसंख्यांक दर्जाची प्रमाणपत्रे देण्यास स्थगिती देण्यात आली होती. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर ही स्थगिती डावलून मंत्रालयातून गुपचूपपणे प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप होत आहे. यावरुनच रोहित पवार यांनीही संताप व्यक्त केला आहे. "सर्वच वंगाळ झालंय, माणसाची काही किंमत आहे कि नाही ? थोड्या फार तर भावना, संवेदना असायला हव्यात की नाही ?" असं त्यांनी म्हटले आहे.
Pune Election: राज ठाकरेंचा मोठा निर्णय! पुण्यातील पराभव जिव्हारी लागल्याने यापुढे...
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world