Satara Doctor Suicide Case: कारवाई केली नाही तर... सातारा महिला डॉक्टर प्रकरणी महिला नेत्याचा मोठा इशारा

Satara Doctor Suicide Case: सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील पीडित कुटुंबीयांची राज्यातील काही महिला नेत्यांनी भेट घेतली.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Satara Doctor Suicide Case: सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी महिला नेत्याने दिला मोठा इशारा"
Canva

Satara Doctor Suicide Case: सातारा जिल्ह्यातील फलटण शहरामध्ये मागील आठवड्यात कथित स्वरुपात आत्महत्या करणाऱ्या महिला डॉक्टराच्या कुटुंबीयांची काही महिला नेत्यांनी भेट घेतली आणि न्यायासाठीच्या त्यांच्या लढाईत पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासनही दिले. शिवसेनेच्या (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) प्रवक्त्या रुपाली ठोंबरे आणि काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी यांनी गुरुवारी (30 ऑक्टोबर 2025) पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली.  

...चेहरा लपवू नका: सुषमा अंधारे

सुषमा अंधारे यांनी मृत महिलेच्या कुटुंबीयांना म्हटले की, "तुमच्या मुलीने काहीही चुकीचे काम केलेले नाही, म्हणून तुम्ही तुमचा चेहरा लपवू नका. न्याय मिळेपर्यंत मी तुमच्यासोबत उभी राहीन. या प्रकरणात सहभागी असलेल्या संबंधितांविरोधात कारवाई केली गेली नाही तर 2 नोव्हेंबरला फलटण पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढेन".

उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर मुद्दा मांडणार: रुपाली ठोंबरे

यादरम्यान  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी स्पष्ट केले की, "महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी केलेले विधान हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका नाही. एक महिला म्हणून मी या विधानाशी पूर्णपणे असहमत आहे. हा मुद्दा थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर उपस्थित करणार आहे". 

काँग्रेस पक्षाच्या नेत्या संगीता तिवारी यांनी मृत पावलेल्या महिला डॉक्टरांच्या कुटुंबीयांना आश्वासन दिलं की, न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पक्षाचा पाठिंबा असेल. यादरम्यान शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मृत महिला डॉक्टरांच्या कुटुंबीयांशी फोनद्वारे बातचित केली. 

Advertisement

(नक्की वाचा: Satara Doctor Suicide Case: महिला डॉक्टरचे हॉटेलमधील CCTV फुटेज, विनंती, रुम नंबर 114 व 17 तासांचे रहस्य; मालक म्हणाला...)

Advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले आश्वासन

दुसरीकडे चाकणकर यांनी केलेले विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पटलेले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले की, "आयोगाचे विचार आमच्या पक्षाची भूमिका दर्शवत नाहीत. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांना सोडले जाणार नाही. मी तुम्हाला लवकरच भेटेन".

27 ऑक्टोबर रोजी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिला डॉक्टरांच्या कॉल रेकॉर्डची माहिती दिली होती. त्यांच्या या भूमिकेस अनेकांनी विरोध दर्शवलाय.   

Advertisement

(नक्की वाचा: Satara Doctor Suicide Case: हॉटेल रुम, फोटो नाराजीनंतर आणखी एक धक्कादायक माहिती, बदनेनं लपवलाय महत्त्वाचा पुरावा?)

(Content Source: PTI Bhasha)