Satara Doctor Suicide Case: सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडालीय. मृत्यूपूर्वी महिला ज्या हॉटेलमध्ये थांबली होती तेथील सीसीटीव्ही फुटेज मालकाने जारी केलंय. महिला डॉक्टर हॉटेलमध्ये किती वाजता आल्या, कोणत्या रुममध्ये थांबल्या होत्या, यादरम्यान नेमके काय संभाषण झालं? याबाबतची माहिती हॉटेल मालक रणजीत भोसले यांनी बुधवारी (29 ऑक्टोबर) प्रसिद्धी माध्यमांशी बातचित करताना सांगितली.
सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; हॉटेलमधील घटनाक्रम | Satara Woman Doctor Suicide News Timeline
सीसीटीव्ही फुटेज आणि हॉटेल मालकाने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर महिला 23 ऑक्टोबर रोजी उशीरा रात्री 1.23 (AM) वाजता हॉटेलच्या गेटवर आल्या. रात्री 1.26 (AM) वाजता हॉटेलच्या रिसेप्शन परिसरात आल्या आणि रुम मिळवण्यासाठी रेजिस्ट्रेशन केले. रेजिस्ट्रेशन झाल्यानंतर रात्री 1.30 (AM) वाजता त्या रुम क्रमांक 114मध्ये गेल्या. सकाळी 11 वाजेदरम्यान हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या रूमचा दरवाजा ठोठावला, पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
(नक्की वाचा: Satara Doctor Suicide Case: हॉटेल रुम, फोटो नाराजीनंतर आणखी एक धक्कादायक माहिती, बदनेनं लपवलाय महत्त्वाचा पुरावा?)
यानंतरही 114 रुममधून कोणत्याही प्रकारे ब्रेकफास्ट किंवा अन्य गोष्टींसाठी ऑर्डर न आल्याने कर्मचाऱ्यांना संशय आला. पुन्हा दुपारी 3 वाजताने स्टाफने महिला डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मग मॅनेजरने हॉटेल मालकाला संपर्क साधून घडला प्रकार सांगितला. म्हणून संध्याकाळी 6.45 वाजता दुसऱ्या किल्लीने हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांच्या रुमचे दार उघडलं. यावेळेस गळफास घेतलेल्या अवस्थेत त्या आढळल्या, याबाबत तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.
(नक्की वाचा: Satara Doctor Suicide Case: सातारा महिला डॉक्टरची आत्महत्या की हत्या? पोस्टमार्टेम रिपोर्टद्वारे मोठा खुलासा समोर)
डॉक्टर महिलेने सुरक्षारक्षकाकडे केली ती विनंती | Satara Woman Doctor Request
बाईकवरुन एकट्या आलेल्या महिला डॉक्टरांनी बॉडीगार्डला विनंती केली, त्यामुळे हॉटेलचे गेट उघडण्यात आल्याचीही माहिती मालकाने दिली. "मी बारामतीला चाललेय पण आता उशीर झालाय त्यामुळे जाणे उचित ठरणार नाही. त्यामुळे सकाळी 9.30 वाजता रुम चेकआऊट करेन", असे महिला डॉक्टरने विनंती केल्याची माहिती मालकाने दिली. तसंच हॉटेल-लॉजींमध्ये रात्री 12 वाजेनंतर रुम द्यायची नाही, असा कोणताही नियम नाहीय. नियमांचं पालन करून माणुसकी म्हणून महिला आहेत म्हणून आम्ही त्यांना रुम दिली, असेही हॉटेल मालकाने स्पष्ट केले.
(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
