जाहिरात

Satara Doctor Suicide Case: आता 'सत्य' बाहेर येणार! महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात SIT ची एन्ट्री

Satara Doctor Suicide Case: सातारा जिल्ह्यातील फलटण (Phaltan) येथे एका महिला डॉक्टरच्या संशयास्पद आत्महत्या प्रकरणात मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

Satara Doctor Suicide Case: आता 'सत्य' बाहेर येणार! महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात SIT ची एन्ट्री
Satara Doctor Suicide Case: यपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते (IPS Tejaswi Satpute) यांच्या नेतृत्त्वात हे तपास पथक (SIT) नेमण्यात आले आहे.
मुंबई:

Satara Doctor Suicide Case: सातारा जिल्ह्यातील फलटण (Phaltan) येथे एका महिला डॉक्टरच्या संशयास्पद आत्महत्या प्रकरणात मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन, महाराष्ट्र शासनाने तातडीने 'विशेष तपास पथकाची' (Special Investigation Team - SIT) स्थापना करण्याचे आदेश जारी केले आहेत. महिला आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते (IPS Tejaswi Satpute) यांच्या नेतृत्त्वात हे तपास पथक (SIT) नेमण्यात आले असून, त्यांना तत्काळ तपास सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मूळच्या बीड जिल्ह्यातील (Beed) असलेल्या आणि सातारा सरकारी रुग्णालयात (Satara Government Hospital) कार्यरत असलेल्या या महिला डॉक्टरचा मृतदेह गेल्या महिन्यात, 23 ऑक्टोबरच्या रात्री, फलटण येथील एका हॉटेलमधील खोलीत आढळला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली होती.

डॉक्टरच्या हातावर लिहिलेल्या 'सुसाईड नोट'मध्ये (Suicide Note) दोन व्यक्तींची नावे नमूद होती: पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाल बदाने आणि सॉफ्टवेअर इंजिनियर प्रशांत बनकर. या दोघांनाही पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

मृत डॉक्टरने आपल्या सुसाईड नोटमध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. PSI गोपाल बदाने यांच्यावर तिने अनेकदा लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केले तर प्रशांत बनकरनं मानसिक छळ (Mental Torture) केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

( नक्की वाचा : Satara Doctor Suicide Case : 'महिला डॉक्टरचे दोघांशीही संबंध, चॅट समोर आले ते...' मंत्र्यांच्या आरोपानं खळबळ )
 

सीसीटीव्ही फुटेज आणि वैद्यकीय अहवाल

हॉटेल मालकाने जारी केलेल्या CCTV फुटेजमध्ये मृत डॉक्टर हॉटेलमध्ये एकटीच प्रवेश करताना दिसत आहे. या फुटेजमुळे 'हत्येचा' दावा करणाऱ्या विरोधकांच्या भूमिकेवर काहीसा दबाव वाढला आहे. शवविच्छेदन अहवालानुसार (Postmortem Report) डॉक्टरचा मृत्यू फाशी घेतल्यामुळे झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महिला डॉक्टरनं केली होती तक्रार

डॉक्टरने यापूर्वी अनेकदा लेखी तक्रारी (Written Complaints) दिल्या होत्या. 19 जून रोजी तिने डेप्युटी एसपींना (DySP) एक पत्र लिहिले होते. या पत्रात तिने काही पोलीस अधिकारी तिच्यावर खोट्या वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्रांवर (False Medical Fitness Certificates) स्वाक्षरी करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला होता.

( नक्की वाचा : Satara Doctor Suicide Case : फोटोवरून वाद, शेवटचा कॉल... डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वीची धक्कादायक माहिती उघड )
 

या सर्व पार्श्वभूमीवर, आयपीएस तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्त्वात स्थापन करण्यात आलेले 'एसआयटी' (SIT) या प्रकरणातील सर्व बाजूंचा, विशेषतः सुसाईड नोटमधील गंभीर आरोपांचा आणि पोलीस अधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपांचा, सखोल आणि निष्पक्ष तपास करेल अशी अपेक्षा आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com