Shivsena Leader Bike Accident : शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा भीषण अपघातात मृत्यू

शिवसेना नेत्याच्या निधनामुळे खेड तालुक्यात शोककळा पसरली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

खेड तालुक्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि चिरणी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व मोहन आंब्रे यांचं अपघाती निधन झाल्याची दुःखद घटना घडली आहे. चिरणी येथे घराचे बांधकाम सुरू असल्याने मंगळवारी दुपारी ते बुलेटवरून लोटेच्या दिशेने निघाले असता, चिरणी पुलावर त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या बाईकची जोरदार धडक बसली.

या भीषण अपघातात आंब्रे यांना गंभीर दुखापत झाली. डोक्याला जबर मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती.

नक्की वाचा - Ichalkaranji Shraddha Academy : कोचिंग सेंटरच्या बाथरूममध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह, इजलकरंजीमध्ये खळबळ

अपघातानंतर तातडीने त्यांना चिपळूण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर रत्नागिरी व त्यानंतर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारांना प्रतिसाद न देता मंगळवारी मध्यरात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे खेड तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Advertisement

Topics mentioned in this article

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world