जाहिरात

Video : 1 तरुण अन् 5 वृद्ध; अंगावर चढून धू धू धुतलं, ज्याच्यासाठी भांडण तो मात्र पळाला; Video होतोय व्हायरल

Seniors Citizen beat up dog owner : व्यायाम सोडून ही वृद्ध मंडळी तरुणाला बेदम मारहाण करीत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

Video : 1 तरुण अन् 5 वृद्ध; अंगावर चढून धू धू धुतलं, ज्याच्यासाठी भांडण तो मात्र पळाला; Video होतोय व्हायरल

Seniors Citizen beat up dog owner : आपल्या पेटला सार्वजनिक ठिकाणी फिरवताना अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. याचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येक श्वानपालकांनी घ्यायला हवी. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात. बंगळुरूतून असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एका श्वानपालकाला बेदम मारहाण करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

तरुण अरोराला बेदम मारहाण...

हा व्हिडिओ बंगळुरूतील ब्रिगेड युटोपिया इस्ट एँटोपिया अपार्टमेंटचा आहे. या व्हिडिओमधील दिसतंय त्यानुसार, काही ज्येष्ठ व्यायाम करताना दिसत आहे. तर तरुण अरोरा आपल्या पेटश्वानाला तेथेच फिरवताना दिसत आहे. काही वृत्तांनुसार पाळीव कुत्र्‍याने तेथे सू केल्यावरुन ज्येष्ठ आणि तरुणमध्ये वाद सुरू झाला. यानंतर तरुण तो प्रसंग शूट करीत होता. त्यावेळी ज्येष्ठ व्यक्तीने त्याचा फोन पाडला. यानंतर तरुण ज्येष्ठाच्या अंगावर धावुन गेला. यानंतर ज्येष्ठ व्यक्तीचे सोबतीही तरुणकडे धावुन आले आणि त्याला मारहाण करू लागले. या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आली असून पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

नक्की वाचा - Mumbai News : 'तो मुंबईचा नाही'; परदेशी तरुणीसोबत घृणास्पद कृत्य करीत देशाला लाज आणणाऱ्याचं सत्य उघड

दुसरीकडे अनेकांनी ज्येष्ठांच्या वागणुकीवर संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारे एका व्यक्तीला मारणं योग्य नसल्याचं वापरकर्त्यांचं म्हणणं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com