
अमरावतीत फेक वेडिंगचा (Amaravati Fake Wedding) एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथे अल्पवयीन मुलींनी बारमध्ये फेक वेडिंगचं आयोजन केलं होतं. पोलिसांनी जेव्हा छापेमारी केली तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. येथे अल्पवयीन मुला-मुली अश्लील कृत्य करीत असल्याचंही समोर आलं आहे.
आतापर्यंत आपण प्री-वेडिंग फोटोशूट, पोस्ट वेडिंग फोटोशूटबद्दल ऐकलं असेल, मात्र अमरावतीत चक्क फेक वेडिंगचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामच्या मदतीने काही अल्पवयीन मुला-मुलींनी फेक वेडिंगचं आयोजन केलं होतं. याच्या माध्यमातून ते बारमध्ये एकत्र जमा झाले. येथे अल्पवयीन मुला-मुलींनी दारू पार्टी केली आणि अश्लील कृत्य करीत असल्याचंही सांगितलं जात आहे. वेडिंगच्या नावाखाली अल्पवयीन मुला-मुलींचा बारमध्ये धिंगाणा सुरू होता.
नक्की वाचा - Crime News: नवऱ्याला फसवण्यासाठी 5 वर्षाच्या पोटच्या मुलीची केली हत्या, महिलेचं संतापजनक कृत्य
अमरावतीत शहरातील या पार्टीमध्ये मुलींना विनामूल्य प्रवेश दिला जात होता. तर मुलांकडून प्रतिव्यक्ती पाचशे रुपये वसूल केले जात होते. या प्रकरणात पोलिसांनी बारमालक आणि पार्टी आयोजकांवर गुन्हे दाखल केले असून दीडशे अल्पवयीन मुला-मुलींवर कारवाई केली आहे. तर काही अल्पवयीन मुलं-मुली अश्लील कृत्य करत असताना आढळून आल्याची देखील माहिती आहे. अमरावतीत अल्पवयीन मुला-मुलींना घेऊन बार चालकानं चक्क फेक वेडिंग पार्टीचं आयोजन बारमध्ये केल्यानं एकच खळबळ उडाली. त्यामुळे समाजसुधारकांच्या अमरावती जिल्ह्यांत नेमक काय चाललंय असा उपस्थित करण्यात येत आहे. मुलांकडून सोशल मीडियाचा सर्रास वापर केला जात, अशावेळी पालकांनीही अधिक सजग राहण्याची आवश्यकता पोलीस अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world