जाहिरात
This Article is From Jul 16, 2024

डोंबिवलीतील महिलेला मित्रासोबतची मस्ती नडली, तो वाचला ती मात्र...

डोंबिवलीतील महिलेला मित्रासोबतची मस्ती नडली, तो वाचला ती मात्र...
डोंबिवली:

अमजद खान, प्रतिनिधी 

Dombivli Women : मित्रांसोबत मस्ती करणे  डोंबिवलीत एका महिलेच्या जिवावर बेतले आहे. डोंबिवलीतील विकास नाका परिसरात मस्तीमध्ये एका महिला तिसऱ्या मजल्यावर खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला. या महिलेसोबत मस्ती करणाऱ्या बंटी नावाच्या तरुणाला कसेबसे लोकांनी वाचविले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मानपाडा पोलिसांनी सुरु केला आहे. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

डोंबिवली पूर्वेतील विकास नाका परिसरात ग्लोब स्टेट नावाची इमारत आहे. या इमारतीमधील एका कार्यालयात गुडीयादेवी मनिष कुमार ही महिला साफसफाईचे काम करते.  ही डोंबिवली पूर्वेतील पिसवली परिसरात राहते. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गुडीयादेवी ही त्याच्या सहकाऱ्यांसोबत होती. ती तिसऱ्या मजल्यावर इमारतयाजवळ बसली होती. जिन्याचा कठडा छोटा आहे.  ती बसली असताना त्याच्यासोबत काम करणारा बंटी नावाच्या सहकारी तिच्यासोबत मस्ती करीत होता. 

( नक्की वाचा : लोकल विस्कळीत झाल्याचा जीवघेणा फटका ! कल्याणच्या वास्तूविशारदाचा दुर्दैवी मृत्यू )

या दोघांची मस्ती सुुरु होती. तेव्हा अन्य लोकही त्याठिकाणी होते. मस्तीमध्ये तरुणाचा हात गुडियादेवी हिला  लागला. त्यावेळी गुडीयादेवी तिसऱ्या मजल्यावरुन थेट खाली पडली. तिच्या सोबत मस्ती करणारा बंटी नावाच्या तरुणाचाही तोल गेला होता. तो कसाबसा वाचला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाची माहिती मिळताच मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. आत्ता पोलिस या प्रकरणात मस्ती करणाऱ्या तरुणाच्या विरोधात काय कारवाई करतात हे पाहावे लागणार आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: