महिलेचे 59 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवणाऱ्या मुख्य आरोपीचाही धक्कादायक शेवट, दुचाकीशेजारी आढळला...

महालक्ष्मी राहत असलेल्या इमारतीतून दुर्गंधी आल्यानंतर तिच्या हत्येचा खुलासा झाला.

Advertisement
Read Time: 3 mins
बंगळुरू:

बंगळुरूमधील महालक्ष्मी हत्या प्रकरणाच्या मुख्य आरोपीने ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील गावात बुधवारी दुपारी गळफास घेत आत्महत्या केली. त्याचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसला. (Bangalore Crime News) त्याची दुचाकीदेखील जवळच उभी होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचं नाव मुक्तीरंजन रॉय आहे. त्याच्याजवळ एक डायरी मिळाली आहे. ज्यात त्याने महालक्ष्मीच्या हत्येचा गुन्हा कबुल केला आहे. महालक्ष्मी आणि रंजन 2023 पासून एकमेकांना ओळखत होते आणि रिलेशनशीपमध्ये होते. दोघे एकाच मॉलमध्ये काम करीत होते. 20 सप्टेंबर रोजी बंगळुरूमधी व्यालिकावल भागातील बसप्पा गार्डनजवळील तीन मजली घरात 29 वर्षीय महालक्ष्मीचा मृतदेह सापडला होता. त्याच्या मृतदेहाचे 59 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते. महालक्ष्मी मल्लेश्वरम एका कॉस्ट्यून आऊटलेटमध्ये टीम लीडर होती.

नक्की वाचा - माझी बायको बनून राहा! 60 वर्षांच्या आईसोबत मुलाने जे केलं ते भयंकर होतं

महालक्ष्मी 4 वर्षांपासून पतीपासून वेगळं राहत होती...
महालक्ष्मीचा भाऊ उक्कम सिंहने सांगितल्यानुसार, तिचं कुटुंबीय नेपाळच्या कठंद राज्यातील टीकापूर गावातील राहणारा आहे. 30 वर्षांपूर्वी आई-वडील कामासाठी बंगळुरूत आले आणि येथेच राहू लागले. महालक्ष्मीचं लग्न नेलनंगलामध्ये राहणाऱ्या हेमंत दास सोबत झालं होतं. हेमंत एका मोबाइल एक्सेसरीजच्या दुकानात काम करतो. महालक्ष्मी एका मॉलमध्ये काम करीत होती. त्यांना चार वर्षांची मुलगीही आहे. महालक्ष्मी आणि हेमंत साधारण चार वर्षांपासू वेगळं राहत होते. अद्याप दोघांचा घटस्फोट झाला नव्हता. त्यांची मुलगी हेमंत यांच्यासोबत राहत होती. महालक्ष्मी मात्र ऑक्टोबर 2023 पासून बसप्पा गार्डनजवळील पाइपलाइन रोडजवळ एका भाड्याच्या घरात राहत होती. 

घरातून दुर्गंधी आल्यानंतर झाला खुलासा...
महालक्ष्मी राहत असलेल्या इमारतीतून दुर्गंधी आल्यानंतर तिच्या हत्येचा खुलासा झाला. त्याच इमारतीत राहणारा जीवन याने शोध घेतला तेव्हा तिच्या खोलीतून खूप जास्त दुर्गंधी येत होती. इतकी की तिच्या दाराजवळ उभं राहणं कठीण झालं होतं. दार बाहेरून लॉक होतं. जीवनने तातडीने महालक्ष्मीच्या कुटुंबीयांना फोन केला. रात्री उशीरा 12.30 वाजता महालक्ष्मीचे कुटुंबीय तिथे पोहोचले. दारावरील लॉक तोडून आत शिरले. तर खोलीत रक्त पसरलं होतं. आणि जमिनीवर किडे फिरत होते. घरातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त पसरल्या होत्या. महालक्ष्मीच्या आईने फ्रीज उघडला तर आत मुलीचं कापलेलं डोकं आणि पाय, शरीराचे 59 पेक्षा जास्त तुकडे होते. 

नक्की वाचा - 'ती'ची एन्ट्री अन् मुंब्रा देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी शेवट; ठाणे पोलिसांनी सांगितलं त्या तक्रारीनंतर फिरलं चक्र 

हत्येच्या दिवशी दोघेजणं महालक्ष्मीच्या घरी दुचाकीवरुन आले होते. त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र महालक्ष्मीचा मॅनेजर, ऑफिसचा सहकारी आणि एका मित्रावर संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी त्याची चौकशी करून सोडून दिलं. मुख्य आरोपी हा ओडिशाचा राहणारा असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं.  

प्राथमिक तपासानुसार, महालक्ष्मीच्या मृतदेहाची तुकडे 19 दिवसांपासून फ्रीजमध्ये बंद होते. आतापर्यंत तिच्या मृतदेहाचे 59 तुकडे मिळाले आहेत. महिलेच्या डोक्याचे तीन भाग करण्यात आले आहे. पायाचे अनेक तुकडे करण्यात आले. शरीरातील आतडे, केस आणि अन्य छोटे भाग एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते.