Today Viral News : दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात कर्जत तालुक्यातील कोदिवले गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतकरी भाऊ विठ्ठल सोनावळे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 21 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 2 ते 3 वाजताच्या सुमारास अज्ञात तस्करांच्या टोळीनं मांस विक्रीसाठी बैलाची चोरी करून त्याची कत्तल केली, असा आरोप केला जात आहे. मांस तस्करांच्या टोळीने त्यांच्या बैलाची चोरी करून निर्घृण कत्तल केल्याचा हा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानं परिसरात एकच खळबळ माजली आहे.
त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं?
मिळालेल्या माहितीनुसार,शेतकरी भाऊ सोनावळे दररोज गुरांना शेतात चरण्यासाठी न्यायचा. एक दिवस बैल कुठेतरी हरवल्याचं सोनावळे यांना कळताच त्यांनी इतर गुरे घरी परत नेली. हरवलेला बैल नेहमीप्रमाणे घरी परत येईल, असं सोनावळे यांना वाटलं आणि ते घरी परतीच्या मार्गावर निघाले. परंतु, रात्रीच या निर्दयी भक्षकांनी बैल पकडून त्याला नदीकाठी नेलं आणि त्याची कत्तल केली, असा आरोप त्यांनी केला आहे.
नक्की वाचा >> Video : मला बोलू नको..1 धावेसाठी श्रेयस अय्यर अन् रोहित शर्मात जुंपली, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची मज्जाच झाली!
गेल्या 15 ते 20 दिवसांत परिसरात घडलेली ही दुसरी घटना असून ग्रामस्थांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीच्या कामासाठी अत्यावश्यक असलेला बैल गमावल्यामुळे सोनावळे यांच्यावर आर्थिक तसेच मानसिक संकट कोसळले आहे. या घटनेनंतर गोरक्षक संघटना,शेतकरी बांधव आणि नागरिकांनी तात्काळ आरोपींना अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे. भाऊ सोनावळे यांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की,“हा फक्त माझा बैल नव्हता,तो माझा परिवाराचा सदस्य होता.अशा निर्दयी टोळ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, तेव्हाच शेतकऱ्यांना न्याय मिळेल.”
नक्की वाचा >> ...अन् प्रेमानंद महाराज ढसाढसा रडले, घडलंय तरी काय? व्हायरल Video मुळे भक्तांची चिंता वाढली
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world