- ग्वाल्हेर पोलिसांनी लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्या तरुणांना फसवणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे
- दोन हायटेक कॉल सेंटरवर छापे टाकून २० तरुणी आणि दोन महिला संचालिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
- रॅकेट mypartnerindia.com आणि uniquerishtey.com या वेबसाइट्सच्या माध्यमातून देशभरातील १५०० तरुणांना फसवलं होतं
लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्या तरुणांना लक्ष्य करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा ग्वाल्हेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सुंदर मुलींचे फोटो दाखवून देशभरातील 1500 तरुणांना गंडा घालणाऱ्या दोन हायटेक कॉल सेंटर्सवर पोलिसांनी छापे टाकले. या कारवाईत 20 तरुणींसह दोन महिला संचालिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. हा रॅकेट आतापर्यंतचे सर्वात खतरनाक रॅकेट असल्याचं ही समोर आलं आहे. हे रॅकेट अतिशय चतुराईने आपली शिकार करत होतं. पण याची टीप पोलीसांना लागली आणि या सर्वांचा गेम झाला. सर्वांनाच पोलीसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीत धक्कादायक खुलासे आरोपींनी केले आहेत.
हे रॅकेट 'mypartnerindia.com' आणि 'uniquerishtey.com' या वेबसाइट्सच्या माध्यमातून कार्यरत होते. जेव्हा एखादा तरुण या साइटवर नोंदणी करायचा, तेव्हा कॉल सेंटरमधील तरुणी त्याला संपर्क साधायच्या. गुगलवरून डाऊनलोड केलेले सुंदर मुलींचे फोटो पाठवून तरुणांना जाळ्यात ओढले जायचे. विशेष म्हणजे, तरुणाला ज्या जातीची किंवा वयाची मुलगी हवी आहे, तशीच माहिती गुगलवरील फोटोंना जोडून दिली जायची. त्यामुळे अनेक तरुणी या जाळ्यात फसत होते. लग्न करण्यासाठी सुंदर मुलगी. शिवाय आपल्याच जातीची. त्यात ही शिकली सवरलेली त्यामुळे मुलं लगेच या गोष्टीला भाळत होते.
मुलगी पसंत पडल्यानंतर मेंबरशिपची गळ या तरुणांना घातली जात होती. लग्न करायचंच आहे. शिवाय फी भरल्यानंतर संबंधीत तरुणीचा नंबर पत्ता मिळणार आहे या आशेने हे तरुणी मेंबरशिप फी भरण्यास तयार होत होते. मग त्यांच्या कडून फी म्हणून मोठी रक्कम उकळली जायची. फी दिल्यानंतर तरुणाला फोटी दिलेला मुलीचा नंबर दिला जात होता. प्रत्यक्षात हा नंबर त्यामुलीचा नसायचा. हा नंबर त्या कॉल सेंटरमध्ये असलेल्या मुलीं पैकीच एकीचा असायचा. नंबर मिळाल्यानंतर या मुली त्या मुलां सोबच बोलत होत्या. चॅटींग करत होत्या. त्याच वेळी त्यांच्याकडून पैसे ही उकळले जात होते.
हे सर्व करण्यासाठी या मुलींना पगार दिला जात होता. प्रत्येक तरुणीला पाच हजार रुपये पगार दिला जात होता. ज्यामुलींनी टार्गेट पूर्ण केले आहे अशा मुलींना बोनस ही दिला जात होता. त्यामुळे या मुली जास्तीत जास्त मुलांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होती. या सर्व बाबी तपासात असे समोर आल्या आहेत. या मुलींच्या जोरोवार हे कॉल सेंटर महिन्याला 3 लाख रुपयांपर्यंत कमाई करत होते. या प्रकरणाचा मुख्य मास्टरमाइंड तिलेश्वर पटेल सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर सर्वच जण हादरून गेले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून 45 मोबाईल, 12 एटीएम कार्ड आणि कॉम्प्युटर जप्त केले आहेत. राखी गौड आणि शीतल चौहान या दोन संचालिकांना पोलिसांनी अटक केली आहे.