- पुण्यातील काळेवाडी परिसरात एका विवाहितेवर तिच्या प्रियकराने गंभीर हल्ला केला
- आरोपी संदेश चोपडे या ३० वर्षीय तरुणाने सासूच्या नावावर असलेले घर विकून पैसे देण्याची मागणी केली होती
- महिला या मागणीला नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्यावर लाथाबुक्क्यांनी तसेच कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली
विवाहबाह्य संबंधाची एक धक्कादायक बातमी पुण्याती समोर आली आहे. एका विवाहीतेन आपला चांगला चाललेला संसार केवळ प्रियकरासाठी मोडला. पण त्यानंतर त्याची पदरी सुखा ऐवजी निराशाच पडली. नवऱ्याला सोडून आल्यानंतर तिच्या सोबत जे काही झाले त्यांनी ती पार हादरून गेली. पुण्यातील काळेवाडी परिसरात ही खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे प्रेमावरचा कुणाचाही विश्वास उडून जाईल. शिवाय कुणी कोणासोबत असं वागू शकतो का असा प्रश्नही या निमित्ताने निर्माण झाला आहे. हे उदाहरण म्हणजे पुढच्याला ठेच मागचा शहाणा असचं म्हणाले लागेल.
प्रेमसंबंधांसाठी पती आणि घरादाराचा त्याग करून आलेल्या एका 30 वर्षीय विवाहितेवर तिच्याच प्रियकराने प्राणघातक हल्ला केला. धक्कादायक बाब म्हणजे, सासूच्या नावावर असलेले घर विकून पैसे आणण्यास नकार दिल्याने हा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संदेश चोपडे हा 30 वर्षाचा तरुण आहे. पीडित विवाहीत महिलेसोबत त्याचे गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते. या प्रेमापोटी महिलेने 18 डिसेंबरच्या नवऱ्याचे घर सोडले. ती आपल्या प्रियकराकडे निघून आली. पण पुढे काय होणार याची तिला पुसटती ही कल्पना नव्हती.
चार दिवस आधी तिने आपले घर सोडले होते. त्यानंतर प्रियकर असलेल्या संदेशसोबत ती राहण्यास आली होती. मात्र, आरोपी संदेशची नजर महिलेच्या सासरच्या मालमत्तेवर होती. त्याने महिलेकडे तगादा लावला की, तिच्या सासूच्या नावावर असलेले घर विकून त्याचे पैसे त्याला द्यावेत. पीडिय तरुणीने ही अवाजवी मागणी फेटाळली. त्यानंतर संदेशने आपले हिंसक रूप दाखवले. 18 डिसेंबर रोजी रात्री 10 च्या सुमारास त्यांचा यावरून वाद झाला.
हा वाद इतका वाढली की या वादात त्याने तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कमी म्हणून की काय त्याने कमरेच्या पट्ट्याने तिला बेदम मारहाण केली. यावरच त्याचं समाधान झालं नाही. त्यांच्या अंगात जणू हैवान शिरला होता. संतापलेल्या आरोपीने घरातील लोखंडी कुलपाने महिलेच्या डोक्यावर वार करून तिला गंभीर जखमी केले.या सर्व घटनेनं ही तरुणी हादरून गेली होती. प्रियकरासाठी नवऱ्याला सोडले. पण चार दिवसातच दोघांचे प्रेम आटले अशी स्थिती निर्माण झाली. तरुणीने या प्रियकरा विरोधात तक्रार दिली आहे. काळेवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world