जाहिरात

Nashik News: पतीसाठी पत्नीची जीवाची बाजी!, 2 बिबट्यांसोबत एकटी भिडली, शेवटपर्यंत नडली, शेवटी अखेर...

अलका ही स्थिती पाहात होत्या. पण त्या घाबरल्या नाहीत. त्यांनी पतीला वाचवण्याचा जणू निर्धार केला होता.

Nashik News: पतीसाठी पत्नीची जीवाची बाजी!, 2 बिबट्यांसोबत एकटी भिडली, शेवटपर्यंत नडली, शेवटी अखेर...
  • पुणे आणि नाशिक जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यांमुळे लोकांमध्ये भीती पसरली आहे.
  • निफाड तालुक्यातील उंबरखेड येथे संतोष चव्हाण यांच्यावर दोन बिबट्यांनी अचानक हल्ला केला आणि ते जखमी झाले
  • संतोष यांच्या पत्नी अलका चव्हाण यांनी धाडसाने ऊसाच्या कांड्यांनी बिबट्यांवर हल्ला करून पतीचे प्राण वाचवले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नाशिक:

राहुल वाघ 

गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. पुणे जिल्ह्यात बिबट्याची तर दहशत आहे. तसाच काहीसा प्रकार नाशिक जिल्ह्यातही घडला आहे. मागील आठवड्यात निफाड तालुक्यातील उंबरखेड येथे  गांगुर्डे यांच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरू होतं. चाळीसगाव येथील ऊसतोडणी कामगार संतोष चव्हाण शेतात काम करत होते. त्यावेळी त्यांच्यावर अचानकपणे दोन बिबट्यांनी हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संतोष चव्हाण घाबरून गेले. यावेळी संतोष यांची पत्नी अलका चव्हाण ही तिथेच होत्या. त्यांनी पतीवर बिबट्याने केलेला हल्ला पाहीला. 

त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता प्रसंगावधान राखत बिबट्याला आव्हान दिले. त्यांनी हातात ऊसाच्या कांड्या घेतल्या. त्याच्या सहाय्याने त्यांनी बिबट्यावरच हल्ला चढवला. शिवाय त्यांनी जोरजोरात आरडाओरडा ही केला. त्यातून त्यांनी दोन बिबट्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला. अलकाच्या धाडसी प्रतिकारामुळे एक बिबट्या पळून गेला. मात्र दुसऱ्या बिबट्याने संतोष यांना जखमी केले. त्यांच्या हाताला पकडून ओढून नेण्याचा प्रयत्न केला. अलका ही स्थिती पाहात होत्या. पण त्या घाबरल्या नाहीत. त्यांनी पतीला वाचवण्याचा जणू निर्धार केला होता. 

नक्की वाचा - Christmas Day 2025: नाताळला गिफ्ट घेऊन येणारा 'तो' सांता क्लॉज कोण होता? काय आहे 'सिक्रेट सांता' चा इतिहास?

जखमी आणि हतबल पतीला पाहून अलका चव्हाण यांनी नव्या ताकदीने, जिद्दीने आणि धैर्याने पुन्हा एकदा दुसऱ्या बिबट्यावर हातातील ऊसाने जोरदार हल्ला केला. अलकाचा हा जबरदस्त प्रतिकार पाहून अखेर बिबट्याने माघार घेतली. बिबट्या घाबरला.  त्याने तिथून धूम ठोकली. संतोष चव्हाण यांची सुटका झाली. पतीवरील अपार प्रेमापोटी अलका चव्हाण यांनी अशक्यप्राय वाटणारी गोष्ट करून दाखवली.  शिवाय बिबट्याच्या हल्ल्या ही एकटीने परतवून लावला. तिने आपल्या पतीचे प्राण वाचवले. या घटनेची माहिती सोशल माध्यमांद्वारे सगळीकडे पसरली. ही बाब बालम बाबा फाउंडेशनला ही समजली. त्यांनी लगेचच पिंपळगाव बसवंत येथील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या संतोष चव्हाण यांची भेट घेतली. 

नक्की वाचा - राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या मुहूर्ताची वेळ ठरली, संजय राऊत यांनी केली घोषणा

यावेळी संतोष, त्यांची पत्नी अलका, त्यांची आई तसेच इतर नातेवाईकांचीही भेट घेण्यात आली. या जीवघेण्या हल्ल्यात संतोष यांचे प्राण वाचले याबद्दल संतोष चव्हाण, त्यांची पत्नी अलका चव्हाण आणि त्यांच्या परिवाराचा सत्कार करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अलका चव्हाण यांच्या धाडसाचा विशेष अभिमान वाटत असल्याने भावाच्या नात्याने बालम बाबा फाउंडेशनच्या वतीने त्यांचा साडी-चोळी आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच त्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी छोटीशी रक्कम रोख स्वरूपात मदत म्हणून देण्यात आली. तसेच इतरांनी देखील या कुटुंबास मदत करावी असं आवाहन बालम बाबा फाउंडेशन च्या वतीने करण्यात आल आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com