जाहिरात

Sanjay Raut: राऊत- शिंदे आमने-सामने!, शिंदेंनी हात जोडले, त्यानंतर राऊतांनी जे केलं त्याची सगळीकडेच चर्चा

शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडानंतर शिंदे आणि राऊत आमनेसामने यायची ही पहिलीच वेळ होती.

Sanjay Raut: राऊत- शिंदे आमने-सामने!, शिंदेंनी हात जोडले, त्यानंतर राऊतांनी जे केलं त्याची सगळीकडेच चर्चा
  • गेल्या तीन वर्षांपासून राजकीय दृष्ट्या दूर असलेले एकनाथ शिंदे आणि संजय राऊत एका कार्यक्रमात भेटले
  • या भेटीत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना आवाज दिला आणि त्यांचा संवाद झाला
  • एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना हात जोडून नमस्कार केला, पण राऊतांनी त्याला प्रतिसाद दिला नाही
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

गेल्या 3 वर्षांपासून ज्यांच्यात विस्तवही जात नाही. गेल्या 3 वर्षांपासून ज्यांच्याविरोधात सातत्याने तोफ धडाधडत आहे. गेल्या 3 वर्षांपासून जे एकमेकांच्या नजरेला नजर ही देत नाहीत. तेच दोन नेते आज एकमेकांच्या समोर आले. एकनाथ शिंदे आणि संजय राऊत हे आज तब्बल 3 वर्षांनी एकमेकांच्या समोर नजरेला नजर देऊन उभे होते. निमित्त एका वृत्तवाहिनीचा कार्यक्रमचं होतं. एकनाथ शिंदे या कार्यक्रमातून निघत होते आणि संजय राऊत या कार्यक्रमात दाखल झाले. त्याच वेळी या दोघांचा सामना झाला. त्यानंतर जे काही झालं त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यावर कमेंटचा पाऊस ही पडत आहे. 

एकनाथ शिंदे निघतायत हे संजय राऊतांना समजताच कुठे आहेत असं म्हणत संजय राऊतांनी थेट शिंदेंना आवाज दिला. संजय राऊत आजारी असताना एकनाथ शिंदे यांनी सुनील राऊत यांना फोन केला होता. आजच्या या 50 सेकंदाच्या भेटीत यावरच हा संवाद झाला. संजय राऊत त्यांनी एकनाथ शिंदे आहेत हे समजताच कुठंय असं विचारलं. तर  एकनाथ शिंदे यांनी राऊत समोर येताच कसे आहात अशी विचारणा केली. त्यावर संजय राऊत सगळं व्यवस्थित असे उत्तरले. शिंदेंनी त्यांना शुभेच्छा दिल्या. आम्ही काय दुष्मन थोडी आहे असं ही ते म्हणाले. त्यावर  मी काय म्हणालो त्यांना असं राऊत म्हणाले.

नक्की वाचा - PMC Election 2026: 'पुणे लवकर बरबाद होईल'!, राज ठाकरे आपल्या मुलाखतीत असं का म्हणाले?

पण हा सर्व संवाद होत असताना राऊतांची एक कृती सर्वांच्याच नजरेत आली. ती कुणाच्या ही नजरेतून सुटू शकली नाही. राऊत एकनाथ शिंदे यांच्या समोर येताच शिंदे यांनी त्यांना हात जोडून नमस्कार केला. पण राऊत त्यांना त्याला कोणताही रिल्पाय केला नाही.  त्यांनी आपले हात मागे बांधले होते. ते तसेच ठेवले. त्यांनी नमस्कार चमत्कार केला नाही. मोजकेच  काही सेकंदाचे बोलणे झाले. त्यानंतर ते तिथून निघून गेले. राऊत जाताच शिंदे ही आपल्या पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले. पण राऊतांच्या या कृतीची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. काही जण राऊतांचा अॅटीट्यूड म्हणून कौतूक करत आहेत तर  काही जण त्यांच्यावर नमस्कार केला नाही म्हणून टीका ही करत आहेत.  

नक्की वाचा - Akola News: ‘एक घर – दोन उमेदवार' यंदाच्या निवडणुकीतला नवा ट्रेंड जोरात, काय आहे गणित?

एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्यातला हा संवाद सध्याच्या राजकीय घडामोडींसाठी महत्वाचा आहे. पण यातल्या कृतीवरून संजय राऊतांवर शिंदे गटाकडून टीका केली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना हात मिळवण्यासाठी हात पुढे केला नमस्कार केला. पण संजय राऊतांनी मात्र हात मिळवण्यासाठी हात पुढे न करता हात पाठीवरच ठेवला. यावरूनच शिंदे गटाने राऊतांवर  निशाणा साधला आहे. शिंदे सेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी हेच का संस्कार अशी टीका केली आहे.  शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडानंतर शिंदे आणि राऊत आमनेसामने यायची ही पहिलीच वेळ होती. पण याआधी दोनदा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमनेसामने आले होते. पण त्यावेळी दोघांनी एकमेकांकडे बघितलं देखील नाही.

नक्की वाचा - Amaravati News: नवनीत राणांची डबल ढोलकी! भाजपच्या गडात जावून विरोधात प्रचार, बोंडे भडकले, थेट सुनावले

एकदा उद्धव ठाकरे फडणवीस आणि एकनाथ शिंदे विधानभवनात समोर समोर आले होते. उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यात संवाद झाला पण एकनाथ शिंदे मात्र कानाडोळा करत निघून गेले. दुसऱ्यांदा आमदारांच्या फोटोसेशनला उद्धव ठाकरेंसाठी सगळेच थांबले होते. त्यावेळी देखील शिंदेंनी ठाकरेंकडे कानाडोळा केला. एककीडे संजय राऊत आणि शिंदेंमध्ये असा संवाद होतो. तर दुसरीकडे ठाकरे आणि शिंदे यांची नजरेला नजर मिळत नाही. पुण्यात काका-पुतणे महापालिका निवडणुकीनिमित्त एकत्र आले आहेत. एरव्ही काका-पुतण्याच्या वरच्यावर भेटी होतच असतात. आता संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर तरी ठाकरे आणि शिंदे यांच्यातली राजकीय कटुता कमी होणार का हे महत्वाचं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com