
Dr. Shirish Valsangkar : सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांकडून कुटुंबीयांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जॉ. वळसंगकर यांचे पुत्र आणि या प्रकरणातील फिर्यादी डॉ. अश्विन आणि सून डॉ. सोनाली यांना पोलीस चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. डॉ. वळसंगकर यांचा मुलगा डॉ. आश्विन याने दिलेल्या फिर्यादीवरून हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या मनीषा मुसळे-माने या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
फिर्यादीच्या अनुषंगाने पोलीस डॉ. आश्विन आणि डॉ. सोनाली यांच्याकडून सविस्तर माहिती घेण्यात येतील. आतापर्यंत या प्रकरणात केवळ आरोपी मनीषा मुसळे-माने यांची चौकशी करण्यात आली आहे. मनीषा मुसळे माने यांच्या चौकशीत नेमकं काय सूरूय या बाबतीत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
वळसंगकरांची इच्छा अपूर्णच राहिली..
वैद्यकीय क्षेत्रात वागताना डॉ. शिरीष वळसंगकर रुग्णांबाबत कायम संवेदनशील होते. ते चांगले मेंदूविकारतज्ज्ञ तर होतेच शिवाय ते परफेक्शनिस्ट होते. त्यांची सहा महिन्यांपूर्वी हृदयावरील शस्त्रक्रिया झाली होती. त्यांना वर्ल्ड टूर करण्याची इच्छा होती. काही महिन्यांपूर्वी त्यांनी स्वत:च विमान खरेदी केलं होतं. ते उत्कृष्ट वैमानिकही होते. ते एव्हिएशन इन्स्टिट्यूट चालवायचं. येथे ते पायलटांना ट्रेनिंग देत होते. त्यांना विमान घेऊन जग फिरायचं होतं. मात्र अचानक झालेल्या वळसंगकर यांच्या मृत्यूमुळे त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली आहे. याशिवाय त्यांना वाडिया रुग्णालय पुन्हा सुरू करायचं होतं. वाडिया रुग्णालय सुरू करायचं.. ज्या रुग्णालयाने मला घडवलं ते बंद असल्याचं दु:ख वळसंगकरांनी व्यक्त केलं होतं. ते रुग्णालय पुन्हा सुरू करण्यासाठी ते प्रयत्न करीत होते.
कोण आहेत डॉ. वळसंगकर?
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी सोलापूरमध्ये न्यूरोलॉजी आणि न्यूरोसर्जरीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली S P Institute of Neurosciences हे अत्याधुनिक सुविधांसह रुग्णालय त्यांनी उभारलं आहे. त्याआधी डॉ. वळसंगकर यांनी सोलापूरमधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथून पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी डॉ. व्ही.एम. मेडिकल कॉलेज, सोलापूर येथून वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यांनी MBBS आणि MD पदव्या शिवाजी विद्यापीठातून प्राप्त केल्या आहेत. तसेच, त्यांनी लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून MRCP (UK) ही पदवीही मिळवली आहे
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world