Solapur News : सोलापुरातील मोहोळ शहरातून एक भयंकर प्रकार समोर आला आहे. नवीन मोबाइल घेऊन न दिल्यामुळे २१ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. प्रवीण जगदीश मायाचारी असं या तरुणाचं नाव आहे. त्याने एका क्षुल्लक कारणावरुन गळफास घेत जीवन संपवलं.
क्षुल्लक कारणावरुन आत्महत्या...
२१ वर्षी प्रवीण मायाचारी बीबीएच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. प्रवीण मायाचारी याचा सात दिवसापूर्वी मोबाइल फोन फुटला होता. घरच्यांकडे मोबाइल घेण्यासाठी पैसे द्या म्हणून तगादा लावला होता. मात्र आई-वडिलांनी पैसे आल्यानंतर मोबाइल घेऊन देतो असं सांगितलं. प्रवीण मायाचारी याच्या वडिलांचे छोटसं इलेक्ट्रॉनिकचे दुकान आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो.
प्रवीण हा 3 एप्रिल रोजी रात्री दहा वाजता जेवण करून झोपण्याच्या खोलीत गेला आणि सकाळी साडेसात वाजले तरी खाली आला नव्हता. त्यावेळेस आईने प्रवीणला आवाज दिला. मात्र त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यावेळेस वडिलांनी त्याच्या खोलीचं दार तोडून पाहिले असता, प्रवीणने गळफास घेतल्याचं दिसून आलं. याप्रकरणी मोहोळ शहर पोलीस ठाण्यात आई-वडिलांनी जबाब लिहून दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world