जाहिरात

Solapur News : सोलापूर हादरलं, 72 तासात 6 भयंकर कांड; नागरिकांमध्ये भीतीचं सावट

सोलापूर जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातील 'दुष्काळी जिल्हा' म्हणून ओळखला जातो. मात्र आता दुर्दैवाने सोलापूर जिल्ह्याची ओळख 'रक्तरंजित सोलापूर' होत असल्याचं चित्र दिसून येत आहे.

Solapur News : सोलापूर हादरलं, 72 तासात 6 भयंकर कांड; नागरिकांमध्ये भीतीचं सावट

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आल्या आहे. तसं पाहता सोलापूर जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातील 'दुष्काळी जिल्हा' म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या काही दिवसात सोलापुरातून हादरवणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. गेल्या ७२ तासांत सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागात तब्बल ६ निर्घृण खून झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनांमुळे सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. 

३ दिवसात ६ हत्या...

१) उळेगावात रक्ताचा सडा - १ मे रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगावमधील शिवाजी नगरचे रहिवासी संजय विठ्ठल शिंदे (वय ५४) यांची अज्ञात कारणावरून गळा चिरून हत्या करण्यात आली. अज्ञात आरोपीने त्यांच्या मानेवर शस्त्राने वार केले होते. या घटनेने उळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

२) वैरागमध्ये दगडाने ठेचून तरुणाचा अंत (२ मे) - दुसरी घटना ही बार्शी तालुक्यातील वैराग शहरात घडली. शनिवारी २ मे रोजी वैरागच्या दत्तनगर परिसरात दिनेश उर्फ अप्पासाहेब दादासाहेब कापसे (वय ३१) या तरुणाचा डोक्यात दगड घालून अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला. भरवस्तीत झालेल्या या खुनामुळे बार्शी तालुक्यात तणावाचं वातावरण पसरलं होतं.

३) बोरामणीत तिहेरी हत्याकांड : एकाच कुटुंबाचा घात (२ मे)​ - वैरागची घटना ताजी असतानाच २ मे रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली. गायत्री सुधाकर मस्के (वय ४२) ​प्रिया मस्के (वय १८ - मुलगी), ​शिवराज मस्के (वय १६ - मुलगा) या तिहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्ह्याची झोप उडाली आहे.

नक्की वाचा - Akola News : एका सिलिंडरमागे 1,920 रुपयांची बचत; अकोल्यात व्यावसायिकांचा जीवघेणा जुगाड

​४) रविवारी सकाळी शहरात थरार (३ मे) - सोलापूर शहरातील गजबजलेला भाग असलेल्या ७० फूट रोड परिसरात रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास पुन्हा एकदा रक्ताने जमीन माखली. माधव नगर येथे सुरेश कृष्णा श्रीराम (वय ३५, रा. नीलम नगर) यांची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. दिवसाढवळ्या झालेल्या या खुनामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं सावट पसरलं आहे. अवघ्या तीन दिवसांत ६ हत्या झाल्याने सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस दलावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com