जाहिरात

Solapur News : बायकोच्या मोबाईल रिचार्जवरून बार्शीत नवऱ्याचं 'तांडव'! कोयता घेऊन फोडले दुकान, पाहा Video

Solapur News :  सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.

Solapur News : बायकोच्या मोबाईल रिचार्जवरून बार्शीत नवऱ्याचं  'तांडव'! कोयता घेऊन फोडले दुकान, पाहा Video
सोलापूर:

सौरभ वाघमारे, प्रतिनिधी

Solapur News :  सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. बार्शीतील एका व्यक्तीनं  पत्नीच्या मोबाईल रिचार्जच्या अगदी क्षुल्लक वादातून एका व्यक्तीने थेट कोयता घेऊन मोबाईल दुकानाची तोडफोड केली. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

काय आहे प्रकरण?

प्राथमिक माहितीनुसार, आरोपी व्यक्तीने बार्शी येथील एका मोबाईल दुकानदाराकडून त्याच्या पत्नीच्या मोबाईलचा रिचार्ज करून घेतला होता. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे तो रिचार्ज मोबाईलमध्ये झाला नाही. या कारणामुळे आरोपीचा पारा चढला आणि त्याने रिचार्ज न झाल्याबद्दल दुकानदाराशी वाद घालण्यास सुरुवात केली.

हा वाद विकोपाला गेला. त्यानंतर आरोपीनं  रागाच्या भरात आरोपीने थेट कोयता हातात घेतला. तो पुन्हा त्याच दुकानात परतला. दुकानात शिरताच त्याने दुकानदाराला धमकावले आणि कोयत्याच्या जोरावर दुकानातील सामानाची, वस्तूंची आणि भिंतीची तोडफोड करण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, आरोपीने कशाप्रकारे दुकानात दहशत माजवली आणि मोठे नुकसान केले.

( नक्की वाचा : Ahilyanagar : लग्नाचा दबाव असह्य झाल्याने अहिल्यानगरमध्ये डान्सरची आत्महत्या; भाजपा नेत्याच्या मुलाला बेड्या )

पोलिसांत गुन्हा दाखल, आरोपी फरार

या घटनेमुळे भयभीत झालेल्या मोबाईल दुकानदाराने तात्काळ बार्शी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या गंभीर घटनेची नोंद घेऊन तातडीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या हा आरोपी फरार असून, बार्शी शहर पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे आणि त्याला लवकरच अटक करण्यात येईल. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपीवर कायद्यानुसार योग्य ती कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

इथे पाहा VIDEO

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com