जाहिरात

हिच 'लायकी'; फरार गुन्हेगारांवर 5 रुपयांचं बक्षीस, दबंग अधिकाऱ्याची हटके कारवाई

एसएसपी मणिकांत मिश्रा यांनी गोळीबार प्रकरणातील तीन गुन्हेगारांवर पाच-पाच रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे, याचे पोस्टरही गावभरात लावण्यात आले आहेत. 

हिच 'लायकी'; फरार गुन्हेगारांवर 5 रुपयांचं बक्षीस, दबंग अधिकाऱ्याची हटके कारवाई
उत्तराखंड:

सर्वसाधारणपणे फरार झालेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस मोठी किंमत लावतात. जितकी जास्त मोठी किंमत गुन्हेगारही तितका मोठा अशी समज आहे. मात्र उत्तराखंडमध्ये एका एसएसपींनी या सर्व समजुती उलथवून टाकल्या आहेत. उधम सिंह नगर पोलिसांचा गुन्हेगारांना पकडण्यासाठी अनोखा अंदाज पाहायला मिळाला.

यातून त्यांनी गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. एसएसपी मणिकांत मिश्रा यांनी गोळीबार प्रकरणातील तीन गुन्हेगारांवर पाच-पाच रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे, याचे पोस्टरही गावभरात लावण्यात आले आहेत. 

गुगल लोकेशनने दिला धोका, प्रेयसीऐवजी तिच्या आईच्या खोलीत पोहोचला प्रियकर; अन्...

नक्की वाचा - गुगल लोकेशनने दिला धोका, प्रेयसीऐवजी तिच्या आईच्या खोलीत पोहोचला प्रियकर; अन्...

सर्वसाधारणपणे गुन्हेगारी प्रकरणांमध्ये फरार आरोपींसाठी अडीच हजार ते 25 हजार रुपयांपर्यंत बक्षीस ठेवलं जातं. अनेकदा बक्षीस घोषित झाल्यानंतर गुन्हेगार स्वताला मोठं मानायला लागतात. एसएसपींनी गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी नवा फॉर्म्युल्याची मदत घेतली. एसएसपी मणिकांत मिश्र यांना गेल्या १२ ऑक्टोबर रोजी जाफरपूरमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत फरार मुख्य आरोपी जसवीर सिंह , मनमोहन सिंह, उर्फसाबी यांच्यावर पाच रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
निवडणुकीपूर्वी घातपाताचा कट; छत्तीसगड सीमेवरील कारवाईत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा
हिच 'लायकी'; फरार गुन्हेगारांवर 5 रुपयांचं बक्षीस, दबंग अधिकाऱ्याची हटके कारवाई
Mulshi family killed pet dog by strangling it aditya Thackeray angry
Next Article
8 वर्षे जीव लावला अन् फासावर लटकवलं; मुळशीतील त्या घटनेवर आदित्य ठाकरेही संतापले!