जाहिरात

Shocking News: जगातील सर्वात हँडसम क्रिमिनल, अखेर का झाली 24 वर्षांची जेल? महिला,तिची मुलगी अन् गंभीर गुन्हा..

लोकांनी त्याला ‘जगातील सर्वात देखणा गुन्हेगार’ असं संबोधलं आहे. त्याचा सुंदर चेहरा हे त्यामागचं कारण आहे. या चेहऱ्यामागे एक हृदयद्रावक कहाणी दडलेली आहे.

Shocking News: जगातील सर्वात हँडसम क्रिमिनल, अखेर का झाली 24 वर्षांची जेल? महिला,तिची मुलगी अन् गंभीर गुन्हा..
World Handsome Criminal News

Most Handsome Criminal In The World : सोशल मीडियावर अशा काही घटना समोर येतात, ज्यामुळे मानवता आणि त्यांच्या विचारसरणीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात. असाच एक प्रकार अमेरिकेतील एका तरुणासंबंधीत उघडकीस आला आहे. कॅमरन हेरिन असं त्या तरुणाचं नाव आहे. लोकांनी त्याला ‘जगातील सर्वात देखणा गुन्हेगार' असं संबोधलं आहे. त्याचा सुंदर चेहरा हे त्यामागचं कारण आहे. या चेहऱ्यामागे एक हृदयद्रावक कहाणी दडलेली आहे. ज्यामध्ये एक आई आणि तिच्या निष्पाप मुलीचा जीव गेल्याची धक्कादायक स्टोरी सांगण्यात आलीय.

काय आहे नेमकं प्रकरण? 

ही घटना 2018 मध्ये घडली होती.अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात कॅमरन हेरिन त्याची फोर्ड मस्टॅग कार जवळपास 160 किलोमीटर प्रतितास वेगाने चालवत होता.त्याचदरम्यान, या भरधाव कारने 24 वर्षांच्या महिलेसह तिच्या 1 वर्षाच्या मुलीला चिरडलं आणि दोघींचा जागीचा मृत्यू झाला.

हँडसम असल्याने लोकांनी दाखवली सहानुभूती 

लांबलेल्या कायदेशीर प्रक्रियेनंतर सप्टेंबर 2021 मध्ये न्यायालयाने कॅमरन हेरिनला 24 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने हा अत्यंत गंभीर गुन्हा मानत स्पष्ट केले की,अतिवेग आणि बेजबाबदारपणामुळे दोन बळी गेले. परंतु, कॅमरनला शिक्षा सुनावल्याचा व्हिडिओ आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच या प्रकरणाला वेगळं वळण लागलं.आरोपीचा देखणा चेहरा पाहून लाखो लोक त्याच्या समर्थनार्थ मतं मांडू लागले.

नक्की वाचा >> महिला कंडक्टरचे आक्षेपार्ह व्हिडीओ, PMPML ने नोटीस धाडलेला पुण्यातील इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे आहे तरी कोण?

काहींनी तर फक्त तो ‘सुंदर आणि निरागस'दिसतो म्हणून त्याची शिक्षा माफ करण्याची मागणी केली.काहींनी म्हटलं, "इतका हँडसम माणूस असे कसे करू शकतो?", तर कोणी म्हटलं, "त्याच्या डोळ्यांत पश्चात्ताप दिसतो,त्याला माफ करायला हवे".हे प्रकरण जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. लोक विचारू लागले – एखाद्याचा चेहरा त्याच्या गुन्ह्यापेक्षा मोठा ठरू शकतो का? सुंदर दिसणारा माणूस कमी दोषी ठरतो का? अनेकांनी हेही म्हटले की सोशल मीडियाने पीडित आई आणि मुलीला जवळजवळ विसरूनच टाकले.

कॅमरन हेरिन कोण आहे?

कॅमरन हेरिनचा जन्म 9 सप्टेंबर 1999 रोजी अमेरिकेतील टॅम्पा शहरात झाला. तो एका सामान्य कुटुंबात जन्मला होता.  त्याच्या आई-वडिलांनी त्याला मेहनत आणि प्रामाणिकपणाचे संस्कार दिले, असं म्हटलं जातं. पण एका चुकीच्या निर्णयाने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. कॅमरन हेरिनच्या प्रकरणामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

नक्की वाचा >> OTT Web Series 2026 : 'पंचायत 5', 'हीरामंडी 2' ते 'मटका किंग', 2026 मध्ये येतायत झोप उडवणाऱ्या 'या' 8 वेबसीरिज

आजच्या सोशल मीडियाच्या युगात कोणत्याही व्यक्तीचं रंगरूप किंवा प्रोफाईल न पाहत, एखाद्या घटनेची सत्यता किती प्रभावी ठरू शकते, असंच उदाहणऱ या प्रकरणाच्या माध्यमातून समोर आलं आहे. एका बाजूला दोन निष्पाप जीव गेले आणि दुसऱ्या बाजूला गुन्हेगारासाठी सहानुभूतीची लाट उसळली. पण एक चूक संपूर्ण आयुष्य बदलू शकते आणि त्याचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात, याचा दाखलाच या प्रकरणाने दिला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com