राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईत स्कॉच मद्याचा साठ्यासह 37 लाख 71 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईत नागपूर (Assembly Election 2024) येथून तब्बल 37 लाख 71 हजार 200 रुपयांचा विदेशी स्कॉच मद्याचा साठा जप्त करण्यात आला.
गुप्त माहिती मिळाल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने तत्काळ याबाबत कारवाई केली. नागपूर पोलीस स्टेशन सीताबर्डीच्या हद्दीत धरमपेठ मुलीच्या शाळेजवळ निलय अशोक गडेकर याच्या राहत्या घरासमोर असलेल्या वाहनामधून हा साठा जप्त करण्यात आला. महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या व हरियाणा राज्यासाठी विक्रीकरीता उपलब्ध असलेल्या मद्याचा साठा सदर वाहनामधून उतरविला जात होता.
नक्की वाचा - एकमेकाचे जिवलग मित्र झाले कट्टर राजकीय वैरी, चाळीसगाव मतदारसंघाचा गड कोणता मित्र राखणार?
हा माल याच जागेवर उभ्या असलेल्या वाहन क्रमांक एम एच 46 बी.के. 6492 टोयाटो फॉर्च्युनर या गाडीची झडती घेतली असता आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या विदेशी मद्य साठयात उच्च प्रतिच्या रेडलेबल, ब्लॅकलेबल, जेबसन, बॅलेंटाईन या सुमारे 71 सीलबंद बाटल्या जमा करण्यात आल्या. हे वाहन आणि जप्त केलेल्या मोबाइलसह मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 37 लाख 71 हजार 200 रुपये एवढी आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world