जाहिरात

Satara News: शाळेत विद्यार्थीनीला BOSS म्हणत वर्षभर चिडवलं, तिच्या वडिलांवरही हल्ला ,संतप्त पालकांचा ठिय्या

कराडजवळील मलकापूर येथे शाळकरी विद्यार्थ्यांकडून एका विद्यार्थिनीला "बॉस"म्हणून वारंवार चिडवण्यात आलं. यामुळे निर्माण झालेल्या वादाने गंभीर स्वरूप धारण केलं.

Satara News: शाळेत विद्यार्थीनीला BOSS म्हणत वर्षभर चिडवलं, तिच्या वडिलांवरही हल्ला ,संतप्त पालकांचा ठिय्या
Satara Karad Malkapur School Case

राहुल तपासे, प्रतिनिधी

Satara School Girl Harrassment Case :  कराडजवळील मलकापूर येथे शाळकरी विद्यार्थ्यांकडून एका विद्यार्थिनीला "बॉस"म्हणून वारंवार चिडवण्यात आलं. यामुळे निर्माण झालेल्या वादाने गंभीर स्वरूप धारण केलं. मुलीच्या वडिलांवर मारहाण आणि दगडफेक झाल्याची घटना घडली.या प्रकरणानंतर संतप्त ग्रामस्थ आणि विद्यार्थिनीच्या पालकांनी कराड शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत दोषींवर कारवाईची मागणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार,विद्यार्थिनीच्या वडिलांच्या वाहनावर "Boss"असे लिहिलेले असल्याने शाळेतील काही विद्यार्थी गेल्या वर्षभरापासून संबंधित विद्यार्थिनीला "बॉस,बॉस" म्हणून चिडवत होते.यापूर्वीही याच कारणावरून वाद निर्माण झाला होता.त्यावेळी पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंची समजूत काढून प्रकरण मिटविण्यात आले होते.

मुलीच्या वडिलांनी विद्यार्थ्यांना जाब विचारला,पण..

मात्र,गेल्या काही दिवसांपासून या मुलीला पुन्हा चिडवण्याचा प्रकार सुरू झाल्याने विद्यार्थिनीच्या वडिलांनी तिला स्वतः शाळेत सोडण्यास सुरुवात केली.दरम्यान, त्यांच्या समोरच विद्यार्थ्यांनी पुन्हा मुलीला चिडविल्याने त्यांनी संबंधित विद्यार्थ्यांना जाब विचारला. त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी अरेरावी करत बेल्टने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नक्की वाचा >> Mahesh Tutorials : मुंबईत फक्त 'या' ठिकाणीच महेश ट्युटोरियलचं कोचिंग सेंटर सुरू,इतर सर्व शाखा बंद, कारण काय?

या गोंधळा दरम्यान शाळेत आलेल्या एका विद्यार्थ्याच्या वडिलांनीही हस्तक्षेप करत मुलीच्या वडिलांच्या डोक्यात दगड मारल्याचा आरोप आहे.या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ आणि विद्यार्थिनीच्या पालकांनी कराड शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.

पालकांनी पोलिसांकडे केली मोठी मागणी

जवळपास दोन तास सुरू असलेल्या चर्चेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दगडफेक करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई तसेच संबंधित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांवर आवश्यक ती कारवाई व समुपदेशन केले जाईल,असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवत दोन्ही बाजूंची भूमिका ऐकून कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

नक्की वाचा >> Akola News: हातात भरल्या बांगड्या, ओठांवर लिपस्टिक..अकोला-बडनेरा ट्रेनमध्ये मुलीने तरुणाला दिली अनोखी शिक्षा

या घटनेमुळे शाळांमधील विद्यार्थ्यांकडून होणारा त्रास,पालकांचा हस्तक्षेप आणि त्यातून निर्माण होणारे गंभीर परिणाम याबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत आहे ग्रामस्थांनी अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शाळा प्रशासन,पालक आणि पोलिसांनी समन्वयाने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com