जाहिरात

Sunjay Kapur: संजय कपूर संपत्ती वादात करिश्माच्या मुलांचा हक्क धोक्यात ? खोट्या मृत्यूपत्राच्या दाव्यानं खळबळ

Sunjay Kapur Property Dispute:  दिवंगत व्यावसायिक संजय कपूर यांच्या मालमत्ता वादाला आता एक मोठे वळण मिळाले आहे.

Sunjay Kapur: संजय कपूर संपत्ती वादात करिश्माच्या मुलांचा हक्क धोक्यात ? खोट्या मृत्यूपत्राच्या दाव्यानं खळबळ
Sunjay Kapur Property Dispute:  अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या मुलांच्या वकिलांनी गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई:

Sunjay Kapur Property Dispute:  दिवंगत व्यावसायिक संजय कपूर यांच्या मालमत्ता वादाला आता एक मोठे वळण मिळाले आहे. दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी सुरू असताना, अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या मुलांच्या वकिलांनी एका कथित मृत्युपत्राला (Will) 'बनावट' ठरवत गंभीर आरोप केले आहेत. मालमत्तेची यादी गुप्त ठेवण्याचा आग्रह हा प्रत्यक्षात संजय कपूर यांच्या संपत्तीची विल्हेवाट लावण्याचा (dispersing or hiding) प्रयत्न आहे. करिश्माच्या मुलांना त्यांच्या कायदेशीर हक्कांपासून वंचित ठेवण्याचा हा एक डाव आहे, असंही त्यांनी सांगितलं

करिश्मा कपूरचे मुलं समायरा कपूर आणि कियान राज कपूर यांच्या वतीने बाजू मांडणारे वरिष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी हे आरोप केले आहेत.

काय आहेत आरोप?

या सुनावणीदरम्यान, जेठमलानी यांनी गंभीर दावा केला की, कपूर यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी प्रिया कपूर यांनी काही मालमत्ता त्यांच्या नावावर हस्तांतरित करून घेतल्या आहेत. या कथित बनावट मृत्युपत्राच्या आधारावर करिश्माच्या मुलांना त्यांच्या हक्कांपासून वंचित केले जात आहे.

जेठमलानी यांनी कोर्टात सांगितले की, संजय कपूर यांच्या मालमत्तेतील दोन बँक खाती (Bank Accounts) पूर्णपणे रिकामी (Empty) करण्यात आली आहेत. एका कंपनीतील 6% शेअर्स देखील प्रिया कपूर यांनी स्वतःच्या नावावर हस्तांतरित केले आहेत.

जेठमलानी यांनी सांगितले की, ' आम्ही मालमत्तेच्या माहितीसाठी त्यांना पत्र (Letter) लिहिले, तसतसे आर्थिक व्यवहारांचा पूर आला.'

( नक्की वाचा : Property Dispute: कुटुंबात संपत्तीवरून वाद नकोय? संजय कपूर वादातून प्रत्येकाने शिकायला हवेत 'हे' 5 नियम )
 

सीलबंद लिफाफ्यातील यादीवरून वाद

संजय कपूर यांची पत्नी प्रिया कपूर यांनी न्यायालयाला विनंती केली होती की, मालमत्तेची संपूर्ण यादी सीलबंद लिफाफ्यात सादर करण्याची परवानगी द्यावी आणि ती गोपनीय (Confidential) ठेवण्यात यावी. जेणेकरून ही माहिती सार्वजनिक होऊ नये.

प्रिया कपूर यांच्या वतीने बाजू मांडणारे वरिष्ठ वकील राजीव नायर यांनी कोर्टात मालमत्तेची यादी देण्याची तयारी दर्शवली, पण ती सार्वजनिक न करु नये आणि कोर्टाबाहेर त्यावर कोणतीही चर्चा न करण्याची अट घातली.

या मागणीला विरोध करताना करिश्मा कपूरच्या मुलांचे वकील महेश जेठमलानी म्हणाले, "हा आमचे तोंड बंद (Silencing us) करण्याचा प्रयत्न आहे आणि आम्ही यासाठी तयार नाही. यावर दोन्ही पक्षांनी चर्चा केली पाहिजे.

गोपनीयतेच्या मागणीवर वकिलांचा आक्षेप

न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी जेठमलानी यांना विचारले की, गोपनीयतेचे पालन करता यावे यासाठी कोणताही मार्ग सुचवावा. यावर जेठमलानी यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. जेठमलानी यांनी आरोप केला की, "हे गोपनीयतेचे ढोंग (Pretense) आहे, जेणेकरून मालमत्ता विखुरली (Dispersed) जाऊ शकेल. हा गोपनीय ठेवण्यासारखा खटला नाही, या गोष्टी सर्वांसमोर (Public) यायला हव्यात."

प्रिया कपूर यांच्या वकिलांनी करिश्माच्या मुलांना 'RK Trust' कडून 19,000 कोटी रुपये मिळाले असल्याचा दावा केला. मात्र, जेठमलानी यांनी स्पष्ट केले की, या रकचमेचा संजय कपूर यांच्या खाजगी मालमत्तेच्या (Private Estate) प्रकरणाशी कोणताही संबंध नाही.

न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले असून या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com