जाहिरात

Swargate Case Update: आरोपीच्या वकीलाचा जबरदस्त युक्तीवाद, प्रकरणाला कलाटणी? कोर्टात काय घडलं?

त्याचबरोबर आरोपीला मदत करणारे आणखी काही जण त्याच्यासोबत आहेत का? हे तपासायचे आहे. त्यामुळे सखोल तपासासाठी 14 दिवसांची पोलिस कोठडी आवश्यक आहे, असं सरकारी वकील म्हणाले.

Swargate Case Update: आरोपीच्या वकीलाचा जबरदस्त युक्तीवाद, प्रकरणाला कलाटणी? कोर्टात काय घडलं?
पुणे:

स्वारगेट बस स्थानकात झालेल्या तरुणीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी दत्तात्रय गाडेच्या वकीलाने कोर्टात जोरदार युक्तीवाद करत त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी केलेल्या युक्तीवादाने एकच खळबळ उडाली आहे. शिवाय या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळेते की काय याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. शिवाय पोलिसांनी दिलेल्या पुराव्याबाबतही या युक्तीवादात आरोपीच्या वकीलाने मोठा दावा केला आहे. दरम्यान या प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे याला 12 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारी वकीलांनी 14 दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

26 वर्षाच्या तरुणीवर स्वारगेट बस स्थानकात अत्याचार करण्यात आले होते. त्यानंतर आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी त्याला कोर्टात सादर करण्यात आलं. त्यावेळी आरोपीच्या वकीलाने जोरदार युक्तीवाद केला. आरोपीची माडिया ट्रायल झाली असं आरोपीच्या वकीलाने सांगितलं. त्याचा चेहरा टीव्हीवर दाखवला गेला. ज्या पद्धतीने दाखवलं गेलं तेवढा गंभीर गुन्हा नाही. ती मुलगी स्वत:हून बसमध्ये गेली होती, असा दावा ही आरोपीच्या वकीलाने कोर्टात केला. तिच्यावर अत्याचार झालेला नाही. दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध झाले, असंही त्यांनी कोर्टासमोर सांगितलं. त्यामुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Amravati News: लग्ना आधीच तरुणी गर्भवती, तो म्हणाला मला हे बाळ हवय पण पुढे मात्र...

आरोपी दत्तावर या आधी चोरीचे आरोप आहे. ते आरोप सिद्ध झालेले नाहीत असं ही त्याच्या वकीलाने सांगितले. शिवाय स्वारगेट बस स्थानकात जे घडलं त्यावेळी त्या मुलीने आरडाओरडा केला नाही. पण जर हे सर्व तिच्या सहमतीने झाले तर मग तिने तक्रार का केली अशी विचारण्या त्याच्या वकीलांना केली असता त्याचाच शोध आता घ्यावा लागेल असं ते म्हणाले. जे सीसीटीव्हीचे पुरावे पोलिस देत आहेत, ते किती खरे आणि किती खोटे हे अजून ठरायचं आहे असंही ते म्हणाले. शिवाय आरोपीच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे असंही त्यांनी कोर्टात सांगितले.  

ट्रेंडिंग बातमी - Swargate case: 'मला पोलिसांनी सांगितलं तेच मी बोललो', योगेश कदम परत फसणार?

दरम्यान सरकारी वकीलांनी आरोपीला 14 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केली. आरोपीवर दाखल असलेल्या 6 गुन्ह्यापैकी 5 गुन्ह्यात तक्रारदार महिला आहेत. त्यामुळे त्याचा महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन काय आहे ते स्पष्ट होते असं सरकारी वकीलांनी सांगितलं. या गुन्ह्यामुळे समाजात तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यामुळे हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपचा आहे. आरोपी सराईत असल्याने त्याने यापूर्वी आणखी काही महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत गैरकृत्य केलेले आहे का? हे तपसायचे आहे, असं ही त्यांनी सांगितलं. 

ट्रेंडिंग बातमी - Maharashtra News: छेड काकाने काढली, भयंकर शिक्षा मात्र संपूर्ण कुटुंबाला मिळाली, कुठे घडलं?

त्याचबरोबर आरोपीला मदत करणारे आणखी काही जण त्याच्यासोबत आहेत का? हे तपासायचे आहे. त्यामुळे सखोल तपासासाठी 14 दिवसांची पोलिस कोठडी आवश्यक आहे, असं सरकारी वकील म्हणाले. सरकारी वकिलांनी याआधी गुन्ह्याची आणि आरोपीवर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती दिली. आतापर्यंत या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज,गुन्ह्याच्या वेळी वापरलेले कपडे तसेच आणखी काही मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत. असं ही सांगितलं. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर आरोपी दत्ता खाडेला 12 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: