
मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणा हा आता भारताच्या हाती लागला आहे. त्याला अमेरिकेतून भारतात आणले गेले आहे. आता त्याच्याकडून महत्वाची माहिती काढून घेण्याचे आव्हान NIA समोर आहे. त्यानुसार राणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. राणाला काही प्रश्न एनआयएकडून विचारले जाणार आहेत. या प्रश्नाच्या माध्यमातून मुंबई वरिल हल्ल्याचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. ते प्रश्न कोणते असू शकतात ते आत समोर आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चौकशीत हे असतील प्रश्न
राणाला विचारलं जावू शकतं की मुंबईवर ज्या वेळी हल्ला झाला, म्हणजेच 26 नोव्हेंबर 2008 ला त्यावेळी त्याचं लोकेशन काय होतं. शिवाय 8 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2008 या काळात तो भारतात कशासाठी आला होता. या दिवसात तो कुठे कुठे गेला?भारतात तो ज्या वेळी राहात होता त्यावेळी तो कुणा कुणाला भेटला होता. तुला मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 ला मोठा आतंकवादी हमला होणार आहे याची माहिती कधी मिळाली? डेविड हेडली ला कधी पासून ओळखतोस? त्याला खोटे कागदपत्र देवून भारतात का पाठवण्यात आलं होतं?
डेविड हेडलीने तुला काय काय सांगितलं होतं? भारतात तो कुठल्या ठिकाणी गेला होता? हेडली भारतात कशासाठी आला होता? तो भारतात होता त्यावेळी त्याच्या बरोबर तुझी काय काय चर्चा झाली या सारखे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. मुंबईवर जो हल्ला झाला त्यात तुझी आणि हेडलीची काय भूमीका होती ? याची ही विचारणा होवू शकते. राणा ला विचारले जावू शकते की त्याने हेडलीला भारतीय वीजा मिळवून देण्यास त्याची कशी मदत केली? मुंबईवर जो हल्ला झाला त्यात तुमच्या दोघांची काय भूमकी होती?
हल्लासाठी जी काही माहिती हवी होती, ती मिळवण्यासाठी हेडलीने तुला कशी मदत केली? तू लश्कर ए तोयबाचा प्रमुख हाफिज सईद याला कसा ओळखतो? हाफिजला तू पहिल्या वेळी कधी आणि कुठे भेटला? हाफीज बरोबर तुझे कसे संबध आहेत? तू लश्कर ए तोयबाची मदत कशी केली होती? मदतीच्या बदल्यात लश्करने तुला काय दिलं होतं? या प्रश्नांची उत्तरही एनआयएला हवी आहेत. हाफीज सईस शिवाय अन्य कुणाला तू ओळखतोस? शेवटची या लोकां बरोबर तुझी कधी बातचीत झाली आहे? लश्करचे किती लोक आहेत. त्यांची बांधणी कशी आहे. संघटनेत भरती कशी होते. ही भरती कोण करतं हे प्रश्नही त्याला विचारले जातील.
लश्करला फंड कुठून येतो. कोण लोक या संघटनेला सर्वात जास्त फंड देतात. त्यांना हत्यारं कोण पुरवतं. कोणत्या कोणत्या देशाकडून तुम्हाला हत्यारं मिळतात. पाकिस्तान आर्मी आणि ISI तुम्हाला कशा पद्धतीने मदत करतात. तुमच्या टार्गेटला तुम्ही कशा पद्धतीने निवडता. हल्ला करण्याच्या सुचना ISI कडून दिल्या जातात का. लश्कर आणि हुजीच्या लोकांना ट्रेनिंग कोण देतं. ISI कशा पद्धतीने ट्रेनिंग देते. त्यासाठी किती अधिकारी असतात. ट्रेनिंगमध्ये काय काय करायला सांगितलं जातं हे प्रश्न ही चौकशी दरम्यान विचारले जाणार आहेत. डॉक्टरचा पेशा सोडून दहशतवादाचा मार्ग का निवडला? मुंबई शिवाय अन्य शहरांवरही हल्ल्याचे नियोजन होते का?
ट्रेंडिंग बातमी - Dombivali News: आधी खून केला मग मजूर बनला, बंगालच्या गुन्हेगाराला डोंबिवलीत पकडला
या हल्ल्यात ISI कडून मेजर इकबाल आणि समीर असी हे सहभागी होते की अजून काही मोठे अधिकारी सहभागी होते. जर सहभागी होते तर त्यांचे नाव काय? हे हल्ले झाले त्याला अर्थ पुरवठा कुणी केला होता. हे हल्ले झाले त्याची माहिती ISI लाच होती की पाकिस्तान सरकारलाही त्याबाबत माहिती होती या सारख्या प्रश्नांना राणाला सामोरे जावे लागणार आहे. शिवाय हल्ला झाला त्यावेळी दहशतवाद्यांना सुचना कोण देत होते या प्रश्नांची उत्तर ही राणाला द्यावी लागणार आहेत. त्याच बरोबर पत्नीला 2008 साली भारतात का आणलं गेलं होतं. तुझ्या कुटुंबालाही मुंबई हल्ल्याची माहिती होती का या सारखे प्रश्न ही त्याला विचारले जाणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world