
अमजद खान
पश्चिम बंगालमध्ये गुन्हा केलेला आरोपी डोंबिवलीत पकडला गेला. पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीली डोंबिवलीचे पोलिस धावून आले. ज्या वेळी या आरोपीला पकडण्यात आलं त्यावेळी त्याने केलेल्या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला. या आरोपी बंगाल पोलिसांनी एका खूनाच्या गुन्ह्यात हवा होता. तो महाराष्ट्रात असल्याची माहिती बंगाल पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार महाराष्ट्र पोलिसांना त्याबाबत सांगण्यात आलं. त्यानंतर सापळा रचून या आरोपीला पकडून बंगाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पत्नीसोबत अनैतिक संबंधातून पश्चिम बंगालमध्ये हा खून झाला होता. हा खून दोन तरुणांनी केला होता. ज्या वक्ती बरोबर अनैतिक संबध होते त्या व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला तातडीने पकडले होते. पण दुसरा आरोपी फरार होण्यात यशस्वी ठरला होता. तो पोलिसांच्या हातावर तुरी देवून गेला होता. हा आरोपी बंगालमधून डोंबिवलीत आला होता. विशेष म्हणजे तो डोंबिवली एमआयडीसीमध्ये मजूर म्हणून काम करत होता. सिराज शहा उर्फ कॅप्टन असं त्याचं नाव होतं.
पश्चिम बंगाल मधील हुगळी येथील डंकुनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत फेब्रुवारी महिन्यात बंटी साव या व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येतील मुख्य आरोपी अनिल साव याला पोलिसांनी तातडीने अटक केली होती. मात्र या हत्येत सहभागी असलेला दुसरा आरोपी सिराज शहा हा पसार होण्यास यशस्वी झाला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. त्यांचा शोध डोंबिवलीत संपला होता. त्यांना तो डोंबिवलीत असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानंतर या प्रकरणाचा शोध करत असलेल्या बंगाल येथील डंकुनी पोलिसांनी मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने यांना याची माहिती दिली. कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला शोधण्याचे काम करण्यात आले. मानपाडा पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. अखेर मानपाडा पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी महेश राळेभात यांच्या पथकाला एक माहिती मिळाली. त्यानुसार आरोपी हा डोंबिवलीत असल्याचे समजले.
डोंबिवली एमआयडीसीत हा संशयीत आरोपी मजूर म्हणून काम करत होता. गेल्या दोन तिन महिन्याापासून तो काम करत असल्याचे समोर आले. शिवाय तो पश्चिम बंगालचा असल्याचं ही पोलिसांना समजलं होतं. लगेचच पोलिसानी त्या मजूराला ताब्यात घेतले. तो मजूर दुसरा कोणी नसून हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी सिराज शहा हाच होता. त्याला अटक करून पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world