जाहिरात

Thane News: हेरगिरी प्रकरणातील आरोपी रवींद्र वर्माची प्रकृती चिंताजनक, कारागृहात काय घडलं?

कोर्टाने वर्मा यांच्या प्रकृतीचा आवाहल न्यायालयात सादर करण्याचे आदेश एटीएस आणि ठाणे मध्यवर्ती कारागृह प्रशासनाला दिले आहे.

Thane News: हेरगिरी प्रकरणातील आरोपी रवींद्र वर्माची प्रकृती चिंताजनक, कारागृहात काय घडलं?
ठाणे:

रिझवान शेख 

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला रवी वर्मा सध्या ठाणे मध्यवर्ती कारागृहात आहे. कारागृहात त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याची माहिती वकिलांनी दिली आहे. रवींद्र वर्मा हा अनेक आजाराने ग्रस्त आहे.  त्याच्यावर उपचाराची सुविधा ठाणे कारागृहात नाही. असं त्याच्या वकीलाने सांगितलं. त्यामुळे वर्मा याला अनेक अडचणींना कारागृह सामोरे जावे लागत आहे. दरम्यान  ठाणे न्यायालयात दाखल अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी एटीएसचा  एकही अधिकारी उपस्थित नव्हता. यावेळी कोर्टाने वर्मा यांच्या प्रकृतीचा आवाहल न्यायालयात सादर करण्याचे आदेश एटीएस आणि ठाणे मध्यवर्ती कारागृह प्रशासनाला दिले आहे. अशी माहिती राजन गिरासे यांनी दिली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रवींद्र वर्मा याला ठाणे कारागृहात भेटण्यासाठी त्याची आई गेली होती. त्यावेळी रवींद्र वर्मा याची प्रकृती चिंताजनक असून कारागृहातील अन्य कैदी रवींद्र वर्माला त्रास देत असलायची माहिती त्याने मुलाखती दरम्यान आईला सांगितली. तसेच रवींद्र वर्मा हा टीबीने ग्रस्त असून टिबीची लागण आपल्याला होईल म्हणून अन्य कैदी बराकमध्ये त्याला एका बाजूला ढकलत असल्याची माहिती ही समोर आली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Assembly News: 'अधिकाऱ्यांना बांधून आणा', मुनगंटीवार भडकले, खोतकर मदतीला धावले, विधानसभेत काय घडलं?

सदरची माहिती वर्माचा वकील राजन गिरासे याना दिल्यानंतर त्यानी  ठाणे न्यायालयात वैद्यकीय कारणास्तव वर्माला जामीन मिळावा असा अर्ज केला होता. या अर्जावर मंगळवारी सुनावणी घेण्यात आली. यावेळी एटीएसच्या वतीने एकही अधिकारी न्यायालयात हजार नव्हता. तर न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी ठाणे कारागृह आणि एटीएस अधिकारी याना रवी वर्माच्या प्रकृतीचा आवाहल न्यायालयात सादर करावा असे निर्देश दिले. हा आवाहल सादर  केल्यानंतर न्यायालय वर्माला जामीन देण्याबाबत निर्णय घेणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com