Thane Election News: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जाणाऱ्या ठाण्यात शिवसेनेने मतदानाआधीच खातं उघडलं आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील प्रभाग क्रमांक '17 अ' मधून एकता एकनाथ भोईर या शिवसेनेच्या पहिल्या विजयी उमेदवार ठरल्या आहेत. निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेआधीच त्यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे.
संगिता सुरेश मोंडकर, स्वाती अनिल देशमुख या दोन अपक्ष उमेदवार याठिकाणी एकता भोईर यांच्या विरोधात निवडणूक लढवत होत्या. मात्र दोन्ही उमेदवारांची अर्ज मागे घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे एकता भोईर यांची ठाणे महापालिकेच्या नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेना आणि एकता भोईर यांच्या कार्यकर्त्यांनी यानंतर जल्लोष सुरु केला आहे. याची अधिकृत घोषणा दुपारपर्यंत केली जाईल.

EKta Bhoir
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world