जाहिरात

Thane News : कॅप्टन खरातचा 'बाप' निघाला ठाण्यातील दीक्षित बाबा; लोकांना लुटून थेट गोवा गाठायचा अन्...

कॅप्टन खरात भोंदूबाबाचे कारनामे ऐकून तुम्ही चक्रावले आहातच. पण या कॅप्टन खरातचाही बाप निघालाय ठाण्यातील एक भोंदू बाबा.

Thane News : कॅप्टन खरातचा 'बाप' निघाला ठाण्यातील दीक्षित बाबा; लोकांना लुटून थेट गोवा गाठायचा अन्...

रिजवान शेख, प्रतिनिधी

Thane News : कॅप्टन खरातचा बाप निघालाय ठाण्यातील कसिनो बाबा. तुमच्यावर कोणीतरी काळी जादू केलीये, तुम्ही मरणार आहात असा बनाव करुन हा कसिनो बाबा लोकांना आपल्या जाळ्याच ओढायचा आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचा. यांचा पैशांनी हा कसिनो बाबा गोव्यात जाऊन कसिनो खेळून फाईव्ह स्टार हॅाटेलची मजा घ्यायचा. पण त्याचे बिंग फुटले आणि आता हा बाबा जेलची हवा खातोय.

कॅप्टन खरात भोंदूबाबाचे कारनामे ऐकून तुम्ही चक्रावले आहातच. पण या कॅप्टन खरातचाही बाप निघालाय ठाण्यातील एक भोंदू बाबा. या फोटोत गुडघ्यांवर बसलेला हाच तो भोंदूबाबा जो खरातचाही बाप निघालाय. मंजूनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा या नावाने हा भोंदू बाबा प्रसिद्ध आहे. याने मुंबई ठाण्यात आणि राज्या बाहेर अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातलाय. तुमच्यावर कोणी तरी काळी जादू केलीये. अघोरी पूजा करुन तुम्हाला भरपूर पैसे मिळवून देतो, तुम्हाला मुलं-बाळ होईल यासाठी पूजा करतो. याची भूरळ पाडून दीक्षित बाबाने ठाणे आणि मुंबईत अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे.

कसिनोसाठी गोव्याची टूर...

हा दीक्षित बाबा लोकांना सहज शिकार बनवायचा. हा बाबा अघोरी पूजा काळी जादू करता पीडितांकडून पैसे घ्यायचा आणि ती काळी जादू-अघोरी पूजा करण्यासाठी गोव्याला जायचा. तिथे पूजा किंवा काळी जादू न करता लुबाडलेले पैसे गोव्यातील कसिनोमध्ये उडवायचा. त्यात पैसे हरला की पुन्हा नवीन शिकार शोधायचा आणि त्याला जाळ्यात अडकवून पुन्हा कसिनो खेळायला गोव्यात यायचा. एवढंच काय तर दररोज हा दीक्षित बाबा रशियन, कझाकिस्तान अशा विविध देशांतील महिलांसोबत दिसायचा.

नक्की वाचा - Nashik Crime: नाशिकमध्ये आणखी एक अशोक खरात! रुद्राक्षांची भिती दाखवत तरुणीवर अत्याचार

कसिनोमध्ये पैसे उडवायचा...

दीक्षित बाबा आणखी एका नावाने प्रसिद्ध आहे ते म्हणजे कसिनो बाबा. एखादी शिकार गळाला लागली आणि त्याच्याकडून पैसे आले की, हा कसिनो बाबा थाटात महागड्या विमान तिकिटावर प्रवास करुन गोव्यातील फाईव्ह स्टार हॅाटेलमध्ये राहत होता. कसिनोमध्ये याचा थाट एखाद्या लक्ष्मी पुत्राला लाजवेल असा होता. अखेर या कसिनो बाबाचे काळे कारनामे उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे कसिनो बाबा लुबाडलेल्या पैशांची उधळपट्टी करीत होता. एका रात्रीत या बाबाने १४ लाखांचं बिल केल्याचंही समोर आलं आहे. या बाबासोबत गोव्यातील कसिनोमधील एक मॅनेजर सामील असल्याचंही उघड झालं आहे. या बाबाच्या बँक खात्यात अनेकांनी लाखो-कोट्यवधी रुपये पाठवलेत. यांचा शोध घेऊन बाबाचे आणखी काळे कारनामे लवकरच उघडकीस येतील.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com